‘नेर्ले..रात्रीत फिरले’ लॉटरी कुणाला?, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा; फटाक्यांची आतषबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 04:16 PM2022-12-19T16:16:05+5:302022-12-19T16:17:45+5:30

राष्ट्रवादीविरुद्ध महाडिक गटात लढत

Both groups claim victory in Nerle Gram Panchayat elections of Sangli district | ‘नेर्ले..रात्रीत फिरले’ लॉटरी कुणाला?, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा; फटाक्यांची आतषबाजी

‘नेर्ले..रात्रीत फिरले’ लॉटरी कुणाला?, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा; फटाक्यांची आतषबाजी

Next

इस्लामपूर : ‘नेर्ले... एका रात्रीत फिरले’ अशी आख्यायिका ठरलेल्या नेर्ले गावात राष्ट्रवादीविरुद्ध महाडिक गट अशा लढतीची चांगलीच हवा आहे. मतदान संपल्यानंतर दोन्ही गटांकडून विजयाचा दावा करत फटाक्यांची आतषबाजी केली. याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.

सत्ताधारी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील समर्थक आणि ज्येष्ठ नेते संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय पाटील सरपंचपदाच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्यासमाेर नानासाहेब महाडिक यांचे भाचे सतीश पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या स्पर्धेत कोणाला लॉटरी लागेल, यावर नेर्ल्यात पैजेला उधाण आले आहे. महाडिक गटाकडून सतीश पाटीलच निवडून येणार असे ठामपणे सांगितले जात आहे. 

‘नेर्ले.. रात्रीत फिरले...’ लॉटरी कुणाला?

गावात ७९ टक्के मतदान झाल्याने मतदारांचा कौल विरोधकाकडे असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळामधून बांधला जात आहे. मात्र ‘नेर्ले... रात्रीत फिरले’ या नेर्लेकरांच्या राजकीय चालीवर कोणाला लॉटरी लागते, हे निकाल झाल्यावरच कळणार आहे.

Web Title: Both groups claim victory in Nerle Gram Panchayat elections of Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.