मंडल अधिकाऱ्यासह दोघांना अटक
By admin | Published: July 22, 2014 11:30 PM2014-07-22T23:30:36+5:302014-07-22T23:31:52+5:30
विट्यात कारवाई : पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
विटा : खानापूर तालुक्यातील आळसंद हद्दीत खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करताना आलेल्या तक्रारीचा निकाल खरेदीदाराच्या बाजूने देण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी व पुरवठा शाखेच्या कर्मचाऱ्याला आज, मंगळवारी रंगेहात पकडण्यात आले. मंडल अधिकारी हणमंतराव सदाशिव कदम (रा. आटपाडी, मूळ गाव कळंबी, ता. मिरज) व हणमंत सखाराम अदाटे (रा. भाळवणी, ता. खानापूर) अशी त्यांची नावे आहेत. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी तीनच्या सुमारास विट्यातील तहसील कार्यालयात ही कारवाई केली. या दोघांना अटक करण्यात आली असून, या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
रेणावीच्या शेतकऱ्याने आळसंद हद्दीतील जमीन खरेदी केली होती. खरेदीपत्र झाल्यानंतर जमिनीची ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी प्रकरण मंडल अधिकाऱ्यांकडे गेले होते. त्यावेळी सहहिस्सेदारांनी जमिनीच्या उताऱ्यावर खरेदीदाराची नोंद करू नये, यासाठी तक्रार केली होती. विटा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून हणमंतराव सदाशिव कदम याच्याकडे महिनाभरापासून भाळवणीच्या मंडल अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे कदमकडे याबाबतच्या / पान ८ वर