वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने पाच लाखाचा गंडा घालणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:02 PM2019-07-04T21:02:05+5:302019-07-04T21:03:12+5:30
कºहाड येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने मिरजेतील कर सल्लागाराची पाच लाखाची फसवणूक करणाºया फैयाजुद्दीन अली मुलाणी (वय ४०, रा. मलकापूर, ता. कºहाड) या एजंटास शहर पोलिसांनी कºहाड येथून
मिरज : कºहाड येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने मिरजेतील कर सल्लागाराची पाच लाखाची फसवणूक करणाºया फैयाजुद्दीन अली मुलाणी (वय ४०, रा. मलकापूर, ता. कºहाड) या एजंटास शहर पोलिसांनी कºहाड येथून अटक केली. मुलाणी यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली. मुलाणी याची टोळी राज्यात विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले.
कºहाड येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने मिरजेतील कर सल्लागार भूपालसिंग सुल्'ान (रा. शिवाजी रोड, मिरज) यांची पाच लाखाची फसवणूक केल्याबद्दल फैयाजुद्दीन मुलाणी याला पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत यांनी कºहाड येथून ताब्यात घेतले. मुलाणी यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली. सुल्'ान यांचा भाचा वृषभ यास वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घायचा होता. मलकापूर येथील फैयाजुद्दीन मुलाणी याने वृषभ यास एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी सुल्'ान यांच्याकडून मार्च महिन्यात त्याने पाच लाख रुपये घेतले. मात्र प्रवेश मिळाला नसल्याने सुल्'ान यांनी रक्कम परत मागितल्याने, मुलाणी याने काही गुंड साथीदारांना सोबत आणून, पैसे परत मागितल्यास जिवे मारण्याची धमकी सुल्'ान यांना दिली.
याबाबत सुल्'ान यांनी मिरज शहर पोलिसांत तक्रार दिली होती. मुलाणी व त्याचे साथीदार राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुलाणी याच्याविरुध्द बोगस धनादेश देऊन फसवणूक केल्याचाही गुन्हा नोंद आहे. मुलाणी याच्याकडून फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.