फुलउमरी येथे धाडसी चोरी; ९0 हजाराचे दागिणे लंपास!
By admin | Published: August 22, 2016 11:52 PM2016-08-22T23:52:34+5:302016-08-22T23:52:34+5:30
मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे भरदिवसा चोरट्यांनी घातला धुडगूस.
सांगली : महापालिका हद्दीतील कचरा उठाव व स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्याकडील अधिकार काढून घेतले आहे. आंबोळे यांच्याकडे केवळ न्यायालयीन कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, इतर जबाबदाऱ्यांसाठी चार सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
कचरा उठाव व स्वच्छतेच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून स्वच्छतेवर अधिक भर दिला होता. वारंवार बैठका घेऊन सूचना करूनही आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. या सर्व कामाची आरोग्याधिकारी डॉ. आंबोळे यांच्यावर जबाबदारी होती. आता त्यांचेच अधिकार कमी करून स्वच्छतेची जबाबदारी इतर चार अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. आंबोळे यांच्याकडे आर्थिक व्यवहार वगळून घनकचराप्रकरणी हरित न्यायालयातील दावा, न्यायिक प्रकरण, कत्तलखाना देखभाल व व्यवस्थापन आदींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी डॉ. वैभव पाटील, डॉ. विजय ऐनापुरे, डॉ, संजय कवठेकर, डॉ. रवींद्र ताटे या चार सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या चार अधिकाऱ्यांकडे घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, नागरी स्वच्छता अभियान, नालेसफाई, विविध परवाने, प्रसुतिगृहे, रुग्णालये, जन्म-मृत्यू विभाग, आपत्कालीन व्यवस्थापन, डास प्रतिबंधक औषध फवारणी व्यवस्था अशा विविध कामांचे स्वतंत्र नियंत्रण देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दहा यंत्रे दुरुस्त
पालिकेकडील औषध फवारणीची ३१ यंत्रे नादुरूस्त होती. महापौर हारूण शिकलगार यांच्या सूचनेनुसार त्यापैकी दहा यंत्रे दुरूस्त झाली आहेत. उर्वरित यंत्रे दुरुस्तीचे काम सुरू आहे. पालिकेचा एक कॉम्पॅक्टर महिनाभर बंद आहे. दोन ते तीन दिवसात तो दुरूस्त होईल. आणखी एक कॉम्पॅक्टर बंद पडला होता, पण तो दुरूस्त झाला आहे. मिरजेत कचरा व स्वच्छतेची समस्या मोठी होती. पण आता यंत्रणा दुरुस्त झाल्याने स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे, असे आयुक्त खेबूडकर यांनी सांगितले.