राष्ट्रवादीमधील आऊटगोर्इंगला ब्रेक , नगरसेवकांचा भाजप प्रवेश लांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:57 PM2018-05-11T22:57:34+5:302018-05-11T22:57:34+5:30
सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत संजय बजाज व कमलाकर पाटील गटात संघर्ष उफाळून आल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यापर्यंत
-शीतल पाटील ।
सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत संजय बजाज व कमलाकर पाटील गटात संघर्ष उफाळून आल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले होते. पण आमदार जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच पक्षातील ‘आऊटगोर्इंग’ला बऱ्यापैकी ‘ब्रेक’ बसला आहे. उलट धनपाल खोत, इद्रिस नायकवडी यांच्यासारख्या दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचे राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे.
जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगलीच्या ऐतिहासिक स्टेशन चौकात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार नुकताच झाला. या सत्काराच्या निमित्ताने भाजपच्या वाटेवर असलेले बहुतांश नगरसेवक यावेळी व्यासपीठावर होते. जयंतरावांनी त्यांचा नामोल्लेख केल्याने या नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रेमाला नव्याने भरती आली आहे. महिन्याभरापूर्वी महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची परिस्थिती वाईट होती.
शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांना पदावरून हटविण्यासाठी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली १८ नगरसेवक व पदाधिकाºयांचा एक गट आक्रमक झाला होता. अगदी प्रदेश पातळीपर्यंत लेखी तक्रारी करण्यात आल्या. गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादीला जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदामुळे संजीवनी मिळाली आहे. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीत मनोमीलनाचे वारे वाहू लागले आहे.
बºयाच महिन्यानंतर बजाज-पाटील गट एका व्यासपीठावर आले होते. या सत्कारापूर्वी हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने स्टेशन चौकातच राष्ट्रवादीची सभा झाली होती. त्या सभेपेक्षा जयंत पाटील यांच्या सत्काराला चांगली गर्दी होती. हल्लाबोलवेळी व्यासपीठावरील डिजिटल फलकावरूनही दोन्ही गटात वाद झाला होता. यावेळी मात्र डिजिटल फलकाची जबाबदारी कमलाकर पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे अगदी किरकोळ कारणावरून सातत्याने होणाºया वादावर पडदा टाकला जात आहे. त्यात शहर जिल्हाध्यक्ष पदाचा वाद महापालिका निवडणुकीपर्यंत तरी बासनात गुंडाळण्यात आला आहे.एकूणच जयंतरावांच्या प्रदेशाध्यक्ष पदाने महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादीला नव्याने बाळसे येऊ लागले आहे.
शहर जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय निवडणुकीनंतर
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत शहर जिल्हाध्यक्ष पदाचा वाद उफाळला होता. पण जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होताच दोन्ही गटाने या वादावर तात्पुरता पडदा टाकला आहे. महापालिकेच्या निवडणुकीवर वादाचा परिणाम होऊ नये, यासाठी कमलाकर पाटील गटाने ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. त्यातच दोन्ही गटांना दुखविणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही परवडणारे नाही. निवडणुकीनंतर या वादावर तोडगा काढण्याचा निर्णय झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
जयंतरावांचा : पायगुण
धनंजय मुंडे यांनीही जयंतरावांचा पायगुण चांगला असल्याचे वक्तव्य केले. त्याची प्रचिती महापालिका हद्दीत येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाडचे नेते धनपाल खोत यांनी भाजपला रामराम ठोकला. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जाहीर चर्चा आहे. तसेच मिरजेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्याशी जयंतरावांनी जमवून घेतले आहे. त्यामुळे मिरजेतील संघर्ष समितीचा बेत रद्द करून तेही राष्ट्रवादीच्या चिन्हावर मैदानात उतरू शकतात. नायकवडी पक्षात आल्यास राष्ट्रवादीला मिरजेत चांगलेच बळ मिळणार आहे. त्यामुळे मिरजेत भाजप प्रवेश करणाºया नगरसेवकांची कोंडी होईल.
महापालिका क्षेत्रात भाजपला मोठा जनाधार नाही. केंद्र व राज्यातील भाजपच्या कारभाराविरोधात लाट निर्माण झाली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर त्यांची भिस्त होती. पण जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्याने सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे. परिणामी एकही नगरसेवक भाजपमध्ये जाणार नाही. उलट नजीकच्या काळात राष्ट्रवादीतच इनकमिंग वाढणार आहे. काँग्रेस व समविचारी पक्षांसोबत आघाडीचा निर्णय जयंत पाटील हेच घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल.
- कमलाकर पाटील, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष
महापालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जयंत पाटील व प्रदेश नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या आहेत. सध्या देशातील वातावरण पाहता, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेससह समविचारी पक्षांची आघाडी करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या भूमिकेला महापालिकेची निवडणूक अपवाद ठरेल, असा आग्रह आमचा राहणार नाही. जयंत पाटील जो आदेश देतील, त्यानुसार आम्ही एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाऊ. - संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष