मल्लिकार्जुन डोंगरावरील बुखरी दर्ग्याची पडझड
By Admin | Published: July 20, 2014 11:39 PM2014-07-20T23:39:37+5:302014-07-20T23:41:56+5:30
हा दर्गा धोकादायक बनला आहे
गोटखिंडी : वाळवा तालुक्यातील गोटखिंडी, येडेनिपाणी, मालेवाडी गावच्या सीमेवर असणाऱ्या मल्लिकार्जुन डोंगरावरील बुखरी दर्ग्याची पावसाने पडझड झाली आहे. हा दर्गा धोकादायक बनला आहे.
येथे चाँद दर्गा व त्यांचे शिष्य बुखरी असे दोन दर्गे आहेत. चाँद दर्ग्याचा लोकसहभागातून जीर्णोध्दार झाला आहे; पण बाजूस असलेल्या दर्ग्याची पडझड झाली आहे. हा दर्गा फार वर्षांपूर्वीचा असल्याने धोकादायक झाला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या दर्ग्याची ओळख आहे.
या दर्ग्याच्या दर्शनासाठी सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथून भाविक येत असतात. येथील पूजा-अर्चेचा मान हिंदू समाजाचे नवनाथ जाधव (मालेवाडी) यांच्याकडे आहे. त्यांनी पुढाकार घेऊन चाँद दर्ग्याचा जीर्णोध्दार केला आहे, पण आता बुखारी दर्ग्याचा जीर्णाध्दार करणे गरजेचे बनले आहे. या दर्ग्यासाठी कोणतीही शासकीय मदत मिळत नाही. तरी भाविकांनी व दानशूर मंडळींनी या दर्ग्याच्या जीर्णाेध्दारासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन तेथील पुजारी नवनाथ जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)