म्हैसाळ भ्रूणहत्याकांडाची चौकशी पूर्ण

By Admin | Published: May 16, 2017 12:08 AM2017-05-16T00:08:25+5:302017-05-16T00:08:25+5:30

म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणाची शासनाने नियुक्ती केलेल्या समितीची चौकशी पूर्ण झाली आहे.

Breastfeeding fetus completed | म्हैसाळ भ्रूणहत्याकांडाची चौकशी पूर्ण

म्हैसाळ भ्रूणहत्याकांडाची चौकशी पूर्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणाची शासनाने नियुक्ती केलेल्या समितीची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशीचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सोमवारी दिली. पुढील आठवड्यात अंतिम अहवाल सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
म्हैसाळमधील खिद्रापुरे याच्या भारती रुग्णालयाच्या विविध प्रकारच्या बेकायदेशीर नोंदी, तसेच त्याने नेमके काय केले, याचा समितीने अभ्यास केला. अशाप्रकारच्या घडणाऱ्या घटनांसाठी कारणीभूत असलेल्या शासकीय यंत्रणेमधील दोष समितीने शोधले आहेत. या घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, हेही शासनाला सुचविले आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे यांच्या मृत्यूबाबत तांत्रिक बाबी, तसेच गर्भपातासाठी वापरली गेलेली औषधे कोठून आणली जात होती, खिद्रापुरेकडे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नसतानाही, त्याला ही औषधे कशी काय देण्यात आली, याचीही समितीने चौकशी केली आहे. शासनाने एक महिन्यात चौकशीचे काम पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची समिती होती. समितीची दोनवेळा बैठक झाली. प्रत्येकाला चौकशीची जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार समितीमधील सदस्यांनी चौकशीचे काम पूर्ण केले. त्यानंतर चौकशीतून पुढे आलेली माहिती, अशा घटना घडू नयेत, यासाठी काय करायला हवे, याबद्दलच्या उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. याचा एकत्रित प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला आहे. अंतिम अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाणार असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले.

सातजणांची समिती
अधिष्ठातांसह याच रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील महिला प्राध्यापिका,जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचाप्रत्येकी एक प्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त व युनिसेफचे पुण्याचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मधुसूदन कर्नाटकी हे या समितीचे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी समितीचे सदस्य सचिव आहेत.

खिद्रापुरेच्या जामिनावर उद्या निर्णय
गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह बाराजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील खिद्रापुरेसह सहाजणांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होऊन सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. न्यायालयाने १७ पर्यंत (बुधवार) जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे.

Web Title: Breastfeeding fetus completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.