गोंधळेवाडीत सख्ख्या भावाचा खून

By Admin | Published: August 3, 2016 12:27 AM2016-08-03T00:27:09+5:302016-08-03T00:27:09+5:30

चाकूने हल्ला : कौटुंबिक वादातून कृत्य; संशयित पसार

A brother's brother in Gondhalwadi | गोंधळेवाडीत सख्ख्या भावाचा खून

गोंधळेवाडीत सख्ख्या भावाचा खून

googlenewsNext

सांगली/उमदी : कौटुंबिक वादातून अत्तू परतू वालेकर (वय ४५) याचा त्याच्या सख्ख्या भावानेच चाकूने हल्ला करून खून केला. गोंधळेवाडी (ता. जत) येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर सुरेश परतू वालेकर हा पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अत्तू वालेकर व संशयित सुरेश वालेकर हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू आहे. या वादातून अनेकदा त्यांच्यात कडाक्याचे भांडणही झाले होते. नातेवाईकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तरीही त्यांच्यात धुसफूस सुरूच होती. मंगळवारी दुपारीही त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर संशयित सुरेश दारू पिण्यास गेला होता. सायंकाळ झाली तरी तो घरी परतला नव्हता. अत्तू वालेकर हे बाजारात गेले होते. ते घरी परतत असताना सुरेशने त्यांना अडविले व घराच्या विषयावरून वाद उकरुन काढला. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. सुरेशने खिशातील चाकू काढून अत्तू यांच्यावर सात ते आठ वार केले. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी नेताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. (प्रतिनिधी/वार्ताहर)
पोलिसांचा छापा
या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली; पण संशयित सुरेश पसार झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. सुरेशच्या शोधासाठी त्याच्या घरावर छापा टाकला, पण घरीही तो आला नव्हता.

Web Title: A brother's brother in Gondhalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.