अनैतिक संबंधातून तरुणास नग्न करून बेदम मारहाण, जमावाचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 19:06 IST2023-07-04T19:06:02+5:302023-07-04T19:06:19+5:30
संबंधित तरुण गंभीर जखमी

अनैतिक संबंधातून तरुणास नग्न करून बेदम मारहाण, जमावाचे कृत्य
जत : जत तालुक्यातील एका गावात अनैतिक संबंधातून तरुणास नग्न करून हात बांधून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संबंधित तरुणाचे नातेवाईक जत पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले होते. मात्र जो व्यक्ती पीडित आहे ताेच तक्रार देऊ शकताे असे सांगून पोलिसांनी नातेवाइकांना परत पाठवून दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित तरुणाचे जत तालुक्यातील एका गावातील महिलेशी अनैतिक संबंध होते. याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी तरुणास बाेलावून घेतले. पंधरा ते वीस जणांनी त्यास माळरानावर नेऊन नग्न करून दाेरीने हात बांधून बेदम मारहाण केली. मारहाणीत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.