अवघ्या १४१ कर्मचा-यांवर बीएसएनएलचा जिल्ह्याचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 04:45 PM2020-02-13T16:45:54+5:302020-02-13T16:48:53+5:30

ते म्हणाले, जिल्ह्यात बीएसएनएलच्या ३६ मालमत्ता आहेत. त्यातील बहुतांशी इमारती अन्य शासकीय संस्थांना भाड्याने देऊन उत्पन्नवाढ करणार आहोत. मोबाईल टॉवर भाड्याने दिल्यानेही चांगले उत्पन्न मिळणार आहे.

 BSNL district load on only 4 employees | अवघ्या १४१ कर्मचा-यांवर बीएसएनएलचा जिल्ह्याचा भार

अवघ्या १४१ कर्मचा-यांवर बीएसएनएलचा जिल्ह्याचा भार

googlenewsNext
ठळक मुद्दे मोबाईल नेटवर्क आणि महसुलामध्ये जिल्हा सातत्याने अग्रस्थानी आहे

सांगली : बीएसएनएलच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३९५ पैकी २५३ कर्मचाºयांनी निवृत्ती स्वीकारली. सध्या १४१ अधिकारी-कर्मचाºयांवर दहा तालुके व सांगली-मिरज शहरांचा भार आहे. कोणताही अडथळा न येता पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षमतेने सेवा देऊ, असा विश्वास महाव्यवस्थापक रंजनकुमार यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, वेतनासाठी दरमहा तीन कोटींचा खर्च व्हायचा. उत्पन्न मात्र २ कोटी रुपये मिळायचे. स्वेच्छानिवृत्तीमुळे वेतन खर्च ९६ लाखांवर आला आहे. रिक्त जागांवर कंत्राटी कर्मचारी भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. मोबाईल नेटवर्क आणि महसुलामध्ये जिल्हा सातत्याने अग्रस्थानी आहे. विविध ठिकाणच्या तेरा ग्राहक सेवा केंद्रांत कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जातील. सध्या गरजेनुसार निवृत्तांची मदत घेत आहोत.

स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतरही सांगली विभाग चांगल्या स्थितीत आहे. मोबाईल नेटवर्कमध्ये आणि महसुलामध्ये टॉपवर आहे. गेल्या काही महिन्यात राज्यभरात अन्य कंपन्यांच्या साठ हजारांहून अधिक ग्राहकांनी बीएसएनएलच्या सेवेला पसंती दिली आहे.

ते म्हणाले, जिल्ह्यात बीएसएनएलच्या ३६ मालमत्ता आहेत. त्यातील बहुतांशी इमारती अन्य शासकीय संस्थांना भाड्याने देऊन उत्पन्नवाढ करणार आहोत. मोबाईल टॉवर भाड्याने दिल्यानेही चांगले उत्पन्न मिळणार आहे. यावेळी उपमहाप्रबंधक व्ही. एम. पाटील, लेखाधिकारी ए. एम. आरकाटे उपस्थित होते.

Web Title:  BSNL district load on only 4 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.