स्वत:ला फार मोठे समजणाऱ्यांचे फुगे फुटले

By admin | Published: March 26, 2017 10:33 PM2017-03-26T22:33:18+5:302017-03-26T22:33:18+5:30

रामराजे नाईक-निंबाळकर : उदयनराजेंवर नाव न घेता केली टीका; कोण कसे वागतो हे जिल्ह्याला माहीत पडले...

The bubbles of those who had big ideas came from | स्वत:ला फार मोठे समजणाऱ्यांचे फुगे फुटले

स्वत:ला फार मोठे समजणाऱ्यांचे फुगे फुटले

Next



सातारा : ‘जिल्ह्यातील काही लोकांना वाटतं आपलं नाव मोठे आहे. असे समजणाऱ्यांचे फुगे फुटले आहेत, कोण कसे वागतो, हे जिल्ह्याला चांगलेच कळाले आहे,’ अशी टीका विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.
येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, पंचायत समित्यांमधील राष्ट्रवादीच्या नूतन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार नरेंद्र पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, अ‍ॅड. राजाभाऊ उंडाळकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुरेश घुले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सत्यजित पाटणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘राष्ट्रवादीशी गद्दारी करणाऱ्यांची यादी आम्ही पक्षनेत्यांना देतो, हे लोक आम्हाला पक्षात नको आहेत. त्यांना पहिल्यांदा पक्षातून बाजूला करा,’ अशी मागणीही रामराजेंनी यावेळी केली.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेची निवडणूक ही छोटी विधानसभेची निवडणूकच असते. पक्षाच्या झेंड्याखाली असतानाही अनेकजण बाहेर पडले. काहींनी आघाडी काढली. राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचे डाव खेळले गेले. रामराजेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी एकत्र आली, देशात कोणाचीही लाट असली, कितीही नोटांचा बाजार झाला असला तरीही घड्याळाचाच गजर जिल्ह्यात झाला. खासदार आमच्याबरोबर नाहीत. आघाडीचे निश्चित नाही. सत्ता गेल्यावर काय शहाणपण शिकावं लागतं हे सर्वांनाच आता कळालेलं आहे. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारले. हे सरकार शेतकऱ्यांनाच दोषी ठरवत आहे. सत्तेच्या मस्तीत धुंद असणाऱ्यांविरोधात आमचा लढा आहे.’
पक्षाची चौकट अधिक कडक करणे जरुरीचे आहे. कार्यकर्त्यांना अधिक ताकद देऊन लोकांना दिलासा मिळवून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचे आवाहनही आमदार शिंदे यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या हॉलचे उद्घाटन दादांच्या हस्ते...
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त जिल्हा परिषदेने बांधलेल्या आॅडिटोरिअम हॉलला ९ कोटी रुपये मिळवून देण्यात अजित पवार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांच्याच हस्ते आॅडिटोरिअम हॉलचे उद्घाटन केले जाणार असल्याचे रामराजेंनी स्पष्ट केले.
आडवं येणाऱ्याला आडवं करू...
भाजपचे सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवित आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकरी जागा करण्याचे काम आम्ही करणार आहोत. निवडणूक कधीही लागू द्या, कोणीही आडवं येऊ द्या, त्यांना आम्ही आडवं करू, असे आमदार शशिकांत शिंदे आक्रमकपणे गरजले.
विधानपरिषदेचा आमदार मकरंद पाटील देतील तोच
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला धोक्याला सामोरे जावे लागले होते. हा संदर्भ जोडून आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील सांगतील, त्यालाच आगामी विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले.

Web Title: The bubbles of those who had big ideas came from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.