राजेवाडी कालव्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक करा
By admin | Published: January 21, 2015 10:57 PM2015-01-21T22:57:03+5:302015-01-21T23:50:43+5:30
गिरीश महाजन : जिल्ह्यातील शिष्टमंडळाला जलसंपदामंत्र्यांचे आश्वासन
आटपाडी : राजेवाडी तलावातील पाणी आटपाडी तालुक्यातील गावांना देणाऱ्या उजव्या कालव्याचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करा, असे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईत जलसंपदामंत्री महाजन यांच्या दालनात काल (मंगळवारी) बैठक झाली. बैठकीस खासदार संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
यावेळी पडळकर यांनी, राजेवाडी तलावाच्या उजव्या कालव्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे आणि माणगंगा नदीवरील खानजोडवाडीपर्यंतचे सर्व बंधारे तलावातील पाण्याने प्रत्येक शेतीच्या पाण्याच्या पाळीच्या वेळेस भरून घ्यावेत, यासह टेंभू योजनेचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशा मागण्या केल्या. (वार्ताहर)
महाजन ३१ रोजी दौऱ्यावर - टेंभू योजनेची अपूर्ण कामे पाहण्यासाठी दि. ३१ जानेवारी रोजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन पाहणी करण्याचे बैठकीत मान्य केले. त्यावेळी म्हैसाळ आणि ताकारी योजनेच्या कामांनाही भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.