बुधगाव- कुपवाड रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:04+5:302021-06-22T04:19:04+5:30
ओळ : बुधगाव-कुपवाड रस्ता रुंदीकरण मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विक्रम पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी संभाजी पाटील, ...
ओळ : बुधगाव-कुपवाड रस्ता रुंदीकरण मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विक्रम पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी संभाजी पाटील, मनोहर पाटील, अभिषेक गावडे, सुनील आवळे उपस्थित होते.
मिरज : बुधगाव-कुपवाड रस्त्यावरून वाहतुक वाढल्याने या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून बुधगाव स्मशानभूमीलगत नवीन पूल बांधण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा मिरज पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. बुधगाव-कुपवाड मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. मात्र रस्ता अरुंद असल्याने तो गैरसोयीचा ठरत आहे. तसेच याच मार्गावरील बुधगाव येथील स्मशानभूमीलगत असणारा पूलही अरुंद आहे. बुधगाव येथील सांडपाणी ओढ्यात सोडण्यात येते. पूल लहान असल्याने सांडपाणी पुलाखाली साचते. त्याच्या दुर्गंधीचा ग्रामस्थांना त्रास सोसावा लागत आहे. यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबर स्मशानभूमीजवळ नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आले आहे.
निवेदन देण्यासाठी संभाजी पाटील, मनोहर पाटील, अभिषेक गावडे, सुनील आवळे उपस्थित होते. बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विक्रम पाटील यांनी यावेळी दिला.