बुधगाव सरपंचांची पोलिसात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:31+5:302021-06-24T04:18:31+5:30
निवेदनात म्हटले आहे की, मी लोकनियुक्त सरपंच असून, ईस्माईल हवालदार, अनिल आवळे, शेखर पाटील, हणमंत कदम हे सदस्य ...
निवेदनात म्हटले आहे की, मी लोकनियुक्त सरपंच असून, ईस्माईल हवालदार, अनिल आवळे, शेखर पाटील, हणमंत कदम हे सदस्य तसेच सदस्या पती विष्णू वसवाडे यांनी माझी हेतूपुरस्सर नाहक बदनामी मोहीम सुरु केली आहे. बुधगावात सुरू असलेल्या खासगी कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामात माझ्या विरोधात अफवा पसरवत आहेत. सदस्य ईस्माईल उर्फ रफिक हवालदार यांनी ग्रामपंचायतीच्या वस्तू हडपण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.
१२ जूनच्या मासिक बैठकीत यापैकी एक सदस्य चोरुन व्हिडिओ करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, यामधील तीन सदस्यांनी पळ काढला. यापूर्वीही असाच एक बोगस व्हिडिओ तयार करुन माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
१६ जून रोजी ग्रामपंचायतीचे संगणक चालक सदानंद पाटील हे गैरहजर असताना महिला शिपाई रंजना कांबळे यांना धमकावून संगणक सुरु करुन त्यातील माहितीची चोरी याच सदस्यांनी केली आहे. असे गंभीर प्रकार हे सदस्य वारंवार करीत असून, येणकेण प्रकारे ञास देऊन राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतात. या सर्व घटनाक्रमाकडे पाहता माझ्या जिवितास धोका निर्माण झाला असून, पोलीस संरक्षण द्यावे. संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत. अशी मागणी केली आहे.