महिला अधिकाऱ्यास सांगली महापालिकेत बिल्डरची दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 08:15 PM2019-12-07T20:15:06+5:302019-12-07T20:51:27+5:30
आहे. बेकायदेशीर बांधकामावर नगररचना अधिनियमानुसार कारवाई करावी. बेकायदेशीर बांधकामे करणा-या बिल्डरवर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली. समितीचे रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर, तानाजी सावंत, शकील शेख, गणेश स्वामी, सुशील माळी, संतोष कदम, महेश जाधव यांनी आयुक्तांना निवेदन दिले.
मिरज : महापालिकेच्या सांगली नगररचना विभागात बिल्डरने कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर बांधकाम मंजुरीसाठी दमदाटी केल्याचा प्रकार घडला. जिल्हा संघर्ष समितीने या घटनेचा निषेध करून समिती महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या पाठीशी असल्याचे निवेदन समितीच्या पदाधिका-यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले.
जिल्हा संघर्ष समितीचे सचिव तानाजी रूईकर नगररचना विभागात गेले असताना, त्यांच्यासमोर सांगलीतील बिल्डरने बांधकाम परवाना मंजुरीसाठी महिला अधिका-यास घेण्याची भाषा करीत उध्दट वर्तन केले. नगररचना विभागातून अधिकारी, कर्मचा-यांनी या प्रकाराबद्दल कोठेही तक्रार केली. नाही. अशा प्रकारामुळे अधिकाºयांना दमदाटी करणा-या बिल्डरने सांगली शहरात महापालिकेचा बांधकाम परवान्याशिवाय चारचाकी वाहनांच्या शोरूमचे दोन हजार चौ. मी. क्षेत्रफळाचे बांधकाम करून २२ लाख रुपये कर बुडवून महापालिकेची आर्थिक फसवणूक केली आहे. बेकायदेशीर बांधकामावर नगररचना अधिनियमानुसार कारवाई करावी.