बैलगाडी शर्यतीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: May 10, 2014 11:55 PM2014-05-10T23:55:31+5:302014-05-10T23:55:31+5:30
मिरज : सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या बैलगाडी शर्यतींवर बंदी आणल्यानंतरही बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण
मिरज : सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या बैलगाडी शर्यतींवर बंदी आणल्यानंतरही बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी शिंदेवाडी (ता. मिरज) येथील तिघा संयोजकांविरुध्द गुन्हा दाखल केला. मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी या शर्यतीस परवानगी नाकारली होती. पोलिसांनी नोटीस बजावून शर्यती घेण्यास मनाई केली होती. मात्र तरीही शिंदेवाडी ते केंपवाड रस्त्यावर शर्यती घेण्यात आल्या. प्राण्यांविषयक काम करणार्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी शिंदेवाडी येथे धाव घेतली. या कार्यकर्त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रार दिली. मनाई केल्यानंतरही शर्यती घेतल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी बैलगाडी शर्यतीच्या संयोजकांविरुध्द गुन्हा दाखल केला. लक्ष्मण साळुंखे, उत्तम पाटील व अभय रणदिवे (सर्व रा. श्ािंदेवाडी) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संयोजकांची नावे आहेत. (वार्ताहर)