सांगलीत ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन
By शीतल पाटील | Published: October 25, 2023 04:20 PM2023-10-25T16:20:09+5:302023-10-25T16:20:30+5:30
सांगली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर आर. एन. फौडेंशनच्यावतीने आयोजित दसरा महोत्सवात ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात ...
सांगली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर आर. एन. फौडेंशनच्यावतीने आयोजित दसरा महोत्सवात ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी नेत्रदीपक आतषबाजीने मैदान उजळून निघाले होते. यावेळी शहरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.
राजेश नाईक फौंडेशनच्यावतीने दसरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, माजी नगरसेवक राजेश नाईक उपस्थित होते. यानंतर गणरायाच्या पहिले नमन या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सॅड्रिक डिसूझा यांच्या टीमचा बहारदार नृत्याविष्कार सादर केला. अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव जोडीच्या हास्याच्या चौफेर फटकेबाजीने सांगलीकरांना खळखळून हसवले. यानंतर ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे तिरंदाजीने दहन करण्यात आले. यावेळी नेत्रदीपक आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, माजी नगरसेवक मनोज सरगर, शेखर माने, पद्माकर जगदाळे, उपायुक्त राहुल रोकडे, काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राजेश नाईक फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप आपटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले. सूत्रसंचलन जयंत भालेराव आणि मोनिका जाजू यांनी केले.