मिरजेत लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकास अटक

By admin | Published: February 3, 2016 12:39 AM2016-02-03T00:39:58+5:302016-02-03T00:39:58+5:30

जामिनासाठी घेतले पैसे : माजी सभापतींची तक्रार

Burying sub-inspector taking bribe | मिरजेत लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकास अटक

मिरजेत लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकास अटक

Next

मिरज : मटकाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात जामिनासाठी माजी सभापती अनिल आमटवणे यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुरेंद्र मोरे याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात अटक केली.
सोमवारी रात्री बेडग येथे मटका घेताना सुरेश पाटील (रा. बेडग, ता. मिरज) या एजंटास ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात मटका बुकी म्हणून अनिल आमटवणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरारी दाखविले होते. पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र मोरे याने मंगळवारी सकाळी आमटवणे यांना अटक करून जामिनावर सोडण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. आमटवणे पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर उपनिरीक्षक मोरे याने जामीन देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. याबाबत आमटवणे यांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सापळा लावला. उपनिरीक्षक मोरे याचे लाचेच्या मागणीचे संभाषण मोबाईलवर रेकॉर्ड करण्यात आले.
पाच हजारांऐवजी दोन हजारात जामीन देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार दोन हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर मोरे याला ताब्यात घेऊन लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. लाचप्रकरणी उपनिरीक्षक रंगेहात सापडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती. मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अनिल आमटवणे यांनी मटक्याशी संबंध नसतानाही राजकीय अस्तित्व नष्ट करण्यासाठी मिरजेच्या आमदारांच्या दबावाखाली पोलिसांनी दोन वेळा मटकाबुकी असल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार केली. (वार्ताहर)

Web Title: Burying sub-inspector taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.