डुलकी येताच बझर वाजणार, अपघात टळणार; लवकरच नवं तंत्रज्ञान येणार

By संतोष भिसे | Published: October 15, 2022 07:20 PM2022-10-15T19:20:03+5:302022-10-15T19:21:54+5:30

वेगावर नियंत्रण, सुरक्षित अंतर राखणे, ओव्हरटेकींग व मार्गिकांचे उल्लंघन टाळणे याकामी वापर होईल. हे सिम्युलेटर परिवहन विभागात लवकरच उपलब्ध होतील.

Buzzer will now do the job of alerting the driver while driving | डुलकी येताच बझर वाजणार, अपघात टळणार; लवकरच नवं तंत्रज्ञान येणार

डुलकी येताच बझर वाजणार, अपघात टळणार; लवकरच नवं तंत्रज्ञान येणार

googlenewsNext

सांगली : गाडी चालवताना चालकाची डुलकी घालवून सावध करण्याचे काम आता बझर करणार आहे. चालकासमोर बसवलेला बझर डुलकीची नोंद घेऊन तीव्र आवाज करेल, आणि चालकाला जागा करेल. या तंत्रज्ञानाचा वापर व्यापक स्वरुपात व्हावा असा सूर आल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कौन्सिलच्या बैठकीत व्यक्त झाला. दिल्लीतील बैठकीला देशभरातून १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

टाटा कंपनीने ट्रकमध्ये बझर प्रणाली बसविली आहे. याचा संदर्भ देत परिवहन आयुक्त विवेक भिमण्णावर म्हणाले, सर्व वाहनांमध्ये या प्रणालीचा वापर आवश्यक आहे. प्रदीर्घ काळ वाहन चालवल्याने चालकाला थकवा व डुलकी स्वाभाविक आहे, अशावेळी गाडीतील बझर चालकाच्या चेहऱ्यावरील बदल लक्षात घेऊन डुलकीपासून जागा करेल. रस्त्यावरील कॅमेरेही गाडीच्या धावण्याची अवस्था पाहून चालकाला सतर्क करतील.

मुख्य परिवहन सचिव आशिषकुमार सिंग म्हणाले की, चालकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे सिम्युलेटर तंत्रज्ञान आता प्रत्यक्ष रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठीही वापरात येईल. वेगावर नियंत्रण, सुरक्षित अंतर राखणे, ओव्हरटेकींग व मार्गिकांचे उल्लंघन टाळणे याकामी वापर होईल. हे सिम्युलेटर परिवहन विभागात लवकरच उपलब्ध होतील.

असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले, नादुरुस्त रस्ते आणि सोयीसुविधांअभावी अपघात वाढताहेत. महत्वाच्या रस्त्यांवर साधे दिशादर्शक फलकही नसतात. अनधिकृत हमाली, वारणी, मामुली, चायपाणी, चपाल, दिवाणजी खर्च या विषयावरही त्यांनी विवेचन केले. बैठकीला सांगलीतून प्रकाश गवळी, राजशेखर सावळे, प्रदीप पाटील, संभाजी तांबडे, प्रीतेश कोठारी, कैलास गोरे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

बंद जकात नाके टर्मिनलसाठी वापरा

बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की, देशभरात जीएसटीची अंमलबजावणी २०१७ मध्ये सुरु झाल्यावर जकात नाके बंद झाले. अनेक महानगरांमध्ये नाक्याच्या जागा रिकाम्या पडून आहेत. त्यांचा वापर ट्रक टर्मिनलसाठी करण्यास मुभा द्यावी.

रस्ते खराब असल्यानेच लेन कटींग

पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महामार्गावर वाहनांनी मार्गिकांचे उल्लंघन करु नये असा नियम आहे. पण सर्रास महामार्गांवर डाव्या बाजुच्या मार्गिका अत्यंत खराब आहेत, त्यामुळेच नाईलाजाने लेन कटींग करावे लागते. रस्ते चांगले झाल्यास अशी वेळ येणार नाही.

Web Title: Buzzer will now do the job of alerting the driver while driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.