हद्दपारीचा भंग करून तिघे गुन्हेगार सांगलीत, शहर पोलिसांनी केली तात्काळ कारवाई
By घनशाम नवाथे | Published: March 11, 2024 05:53 PM2024-03-11T17:53:00+5:302024-03-11T17:53:29+5:30
सांगली : हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केलेल्या अभिषेक दिपक कुंटे (वय २०, रा. बुरुड गल्ली, सांगली ), ...
सांगली : हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केलेल्या अभिषेक दिपक कुंटे (वय २०, रा. बुरुड गल्ली, सांगली), करण किशोर ओगानिया (वय १९, रा. गवळी गल्ली, सांगली), समीर रजमान नदाफ (वय ४०, रा. शंभर फुटी, नुरानी मशिदनजीक, गल्ली क्र.२, सांगली) या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली.
अधिक माहिती अशी, अभिषेक दिपक कुंटे (वय २०, रा. बुरुड गल्ली, सांगली ) या गुन्हेगारास दि. २० जुलै २०२३ रोजी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे. मात्र कोणतीही परवानगी न घेता अभिषेक हा आदेशाचा भंग करून कर्नाळ रस्त्यावरील झेंडा चौकात थांबल्याचे दिसताच त्याला ताब्यात घेतले.तसेच कृष्णानदीकाठावर डॉ. वसंतदादा पाटील यांचे समाधी स्थळाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ मध्यरात्री दिडच्या सुमारास हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून आलेल्या करण किशोर ओगानिया (वय १९, रा. गवळी गल्ली, सांगली ) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दि. १८ जानेवारी २०२३ रोजी दोन वर्षाकरिता हद्दपार केलेल्या समीर रजमान नदाफ (वय ४०, रा. शंभर फुटी, नुरानी मशिदनजीक, गल्ली क्र.२, सांगली ) शंभर फुटी रस्त्यावर सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथकाने ही कारवाई केली.
तिघेही सराईत गुन्हेगार
हद्दपारीचा भंग केल्याबद्दल शहर पोलिसांनी अटक केलेले तिघेही गुन्हेगार सराईत आहेत. ते विना परवाना शहरात आले होते. पोलिसांनी वेळीच त्यांच्यावर कारवाई केली.