हातचलाखी, एटीएम कार्डात फेरफार करत एकास ३३ हजारास गंडा; सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:50 PM2022-02-11T17:50:29+5:302022-02-11T17:50:50+5:30
सांगली : माधवनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यास गेलेल्या तरुणाचे कार्ड हातचलाखी करत बदलून ३३ हजारांची रक्कम काढण्यात आल्याचा ...
सांगली : माधवनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यास गेलेल्या तरुणाचे कार्ड हातचलाखी करत बदलून ३३ हजारांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रामबाबू रघूनाथ बेन (मूळ उत्तरप्रदेश सध्या सांगलीवाडी) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि. २ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास बेन हे पैसे काढण्यासाठी माधवनगर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर गेले होते. यावेळी ते पैसे काढत असताना, पाठीमागे उभ्या असलेल्या तरुणाने त्यांना तुम्ही रक्कम काढताना जादा ७५ रुपये चार्ज लागतात, विना चार्जेस पैसे काढायचे ते दाखवतो म्हणत त्याने कार्ड मागून घेतले.
यावेळी त्याने त्यांचा पीनही पाहिला होता. त्यानंतर एटीएम कार्ड बदलून दिले. यानंतर संशयिताने माधवनगर येथील वेगवेगळ्या तीन एटीएम सेंटरमधून ३३ हजार रुपये काढले. आपल्या परस्पर खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे बेन यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली.