सांगली जिल्ह्यातील १४ परीक्षार्थींनी फडकविला सीए परीक्षेत झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:26 IST2024-12-28T16:25:22+5:302024-12-28T16:26:05+5:30
सांगली : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सनदी लेखापाल ( सीए ) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सांगली जिल्ह्यातील १४ परीक्षार्थ्यांनी ...

सांगली जिल्ह्यातील १४ परीक्षार्थींनी फडकविला सीए परीक्षेत झेंडा
सांगली : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सांगली जिल्ह्यातील १४ परीक्षार्थ्यांनी यशाचा झेंडा फडकविला असून, त्यामध्ये आठ मुली आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थी असे : कुणाल पवार, सुजय पाटील, नंदिनी नेमाणी, स्मिता सावळे, निशिता पाटील, अरबाज मुल्ला, प्रचिती आवटी, शार्दूल कुलकर्णी, तबस्सूम मुलाणी, प्रणोती मोहिते, आकाश पाटील, ऐश्वर्या पाटील, चैतन्य चव्हाण, गायत्री केरीपाळे.
नोव्हेंबर महिन्यात ही अंतिम परीक्षा झाली होती. ग्रुप दोनमधून ३० जण परीक्षेला बसले होते. त्यांपैकी सातजण उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपमधून ४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये फक्त तिघे, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये फक्त चौघे उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपमध्ये सहाजण उत्तीर्ण झाले आहेत.