डिंबे जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन, शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 02:21 PM2020-03-10T14:21:09+5:302020-03-10T14:22:18+5:30
सांगली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सांगलीच्या वार्षिक योजना 2019 20 अंतर्गत नाविन्यपूर्ण बाबींमधुन ...
सांगली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सांगलीच्या वार्षिक योजना 2019 20 अंतर्गत नाविन्यपूर्ण बाबींमधुन शेततलावातील मत्स्यपालन चालना देण्याची योजना अंतर्गत निवडण्यात आलेल्या मिरज व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा दिनांक 5 मार्च ते 7 मार्च 2020 दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये मत्स्यबीज उत्पादन केंद्र धोम जि. सातारा , मॅप्रो फळप्रक्रिया केंद्र वाई , कृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यांमध्ये असलेल्या डिंबे धरणाच्या जलाशयामध्ये तयार केलेल्या पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन प्रकल्पास भेट दिली.
तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगली मार्फत राबवण्यात येत असलेल्या शेततळ्यात मत्स्य पालन चालना देणे या प्रकल्पात शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शेततळ्यातील मत्स्यपालन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी 20 शेतकऱ्यांच्या 10 गटाची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण शेतीशाळा शेतकरी सहली आयोजित करून शास्त्रीय माहितेदेण्यात येत आहे.
शेतीपूरक असणाऱ्या मत्स्यपालन या बाबीवर यामध्ये भर देण्यात येत असून शेततळे फक्त संरक्षित पाणीसाठा म्हणून न वापरता त्यामध्ये मासेपालन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जिल्हाधिकारी सांगली डॉ अभिजित चौधरी यांच्या संकल्पनेतून सदरचा प्रकल्प आत्मा सांगली मार्फत राबवण्यात येत आहे.
सदरचा प्रकल्प यशस्वीतेकडे वाटचाल करत असून प्रकल्पातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन देशातील पहिली मत्स्य उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन केली आहे प्रत्येक टप्प्यावर शेतकर्यांना शेतीशाळे मार्फत मार्गदर्शन करण्यात येत असून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी शेतकरी कृषी विभाग व आत्माचे अधिकारी काम करत आहेत.
या अभ्यास दौऱ्यात धोम धरण तालुका वाई जिल्हा सातारा येथील मत्स्यउत्पादक केंद्रास तसेच कृषी विज्ञान केंद्र बारामती येशील मत्स्यप्रकल्पास तसेच (केज कल्चर) बंदीस्त पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन या प्रकल्पास भेटी देण्यात आल्या. यामध्ये शंभर शेतकरी सहभागी झाले होते.
सहलीचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अमर पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी हनुमंत इंगवले, तालुका कृषी अधिकारी मिरज प्रदीप कदम, तासगाव तालुका कृषी अधिकारी रमेश मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
आत्माचे जिल्हा समन्वयक मुकुंद जाधवर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विवेककुमार पाटील, आयसीआयसीआय फौंडेशनचे गणेश माळी, बेडगचे डॉ. रवींद्र शेळके, राजाराम खरात, तानाजी सोलनकर, राम खाडे, सावर्डेचे शेतकरी गटाचे प्रमुख प्रमोद निकम, सभासद शेतकरी मनोज माने ,विनोद पाटील ,आदी शेतकरी सहभागी होते.