नेर्ले येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:28+5:302021-05-12T04:27:28+5:30

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील माने वस्तीवरील संतोष ऊर्फ सोन्या विठ्ठल माने यांच्या गोठ्यात बांधलेल्या दुभत्या कालवडीचा बिबट्याने ...

The calf was killed in a leopard attack at Nerle | नेर्ले येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

नेर्ले येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

Next

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील माने वस्तीवरील संतोष ऊर्फ सोन्या विठ्ठल माने यांच्या गोठ्यात बांधलेल्या दुभत्या कालवडीचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

नेर्ले येथील आशियायी महामार्गालगत असणाऱ्या अदिती फूड्सच्या पाठीमागे पश्चिमेला संतोष माने व इतर लोकांची मानवी वस्ती आहे. घरासमोर त्यांचा दुभत्या जनावरांचा गोठा आहे. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या व त्याची पिल्ले यांनी येऊन दावणीला बांधलेल्या गाईच्या कालवडीवर हल्ला चढवला. यात कालवड जागेवरच ठार झाली. भुकेच्या तडाख्याने दोन वर्षे वयाच्या कालवडीचा पंचाहत्तर टक्के भाग बिबट्याने फस्त केला होता.

वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर यांनी घटनास्थळी धाव घेत माने यांना नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्यासंबंधी सूचना दिल्या. नेर्ले, पेठ, माणिकवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी व दूध उत्पादकांत भीतीचे वातावरण आहे. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर पाटील, विजय लोहार, विजय मोरे, हणमंत माने, वकील माने उपस्थित होते.

चौकट

वन्यजीव प्राणी हल्ला नुकसानभरपाई अंतर्गत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. बिबट्याचा वावर असल्याने लोकांनी सावधानता बाळगावी. रात्री गोठ्यात बल्ब लावावा. टेपवर गाणी लावावी.

- दीपाली सागावकर, वनरक्षक अधिकारी, शिराळा.

Web Title: The calf was killed in a leopard attack at Nerle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.