चितळे डेअरीतर्फे पूरग्रस्त जनावरांसाठी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:38+5:302021-07-31T04:26:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : पलुस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथे कृष्णाकाठच्या पूरग्रस्त जनावरांसाठी आरोग्य तपासणी मोहीम दि. २९ जुलै ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : पलुस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथे कृष्णाकाठच्या पूरग्रस्त जनावरांसाठी आरोग्य तपासणी मोहीम दि. २९ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. मे. बी. जी. चितळे डेअरी पशुसंवर्धन विस्तार विभाग, शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालय व राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे व चितळे डेअरीचे संचालक अतुल चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मकरंद चितळे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पराग उपस्थित होते.
विश्वास चितळे, पुष्कर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चितळे डेअरीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. एच. आर. इंगळे, सी. व्ही. कुलकर्णी, डॉ. सचिन रहाणे, डॉ. ऋतुराज कदम, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. रांगणेकर आदी परिश्रम घेत आहेत.
300721\img_20210730_133246.jpg
फोटो - भिलवडी स्टेशन येथे जनावरे तपासणी शिबिर प्रसंगी अतुल चितळे,मकरंद चितळे,डॉ.धनंजय दिघे,डॉ. किरण पराग आदी.