वीजबिलातील स्थिर आकार रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:32+5:302021-03-21T04:24:32+5:30
फोटो ओळ : कुपवाड शहरातील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी अमर दिडवळ, अनिल ...
फोटो ओळ : कुपवाड शहरातील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी अमर दिडवळ, अनिल कवठेकर, बिरू आस्की आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : गेल्या वर्षभरात कोरोनाने घातलेल्या धुमाकुळाने सर्वसामान्य जनता व व्यापारी अडचणीत आला आहे. अशातच वीजबिलाची सक्तीची वसुली मोहीम सुरू केल्याने जनता हैराण झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करून वीजबिलातील स्थिर आकार रद्द करावा आणि बिल भरण्यास सवलत द्यावी, अशी मागणी कुपवाड व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्यायी व सक्तीच्या वीजबिलाविरोधात कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने प्राथमिक टप्प्यात आंदोलन हाती घेण्याचे ठरविले आहे. याबाबतचे लेखी निवेदन महावितरणच्या कुपवाड विभागीय अधिकाऱ्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, लाॅकडाऊन काळातील स्थिर आकार रद्द करा, लाइट कनेक्शन कट न करता बिलाचे हप्ते ठरवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ, उपाध्यक्ष बिरू आस्की, अनिल कवठेकर, रमेश जाधव, श्याम भाट, विठ्ठल संकपाळ, अभिजित कोल्हापुरे, राजू खोत, अनिल गडदे यांसह अन्य व्यापारी उपस्थित होते.