कागनरीत उसाच्या शेतात गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:58+5:302021-05-21T04:26:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संख : कागनरी (ता. जत) येथील लक्ष्मण आप्पाराया जगदाळे (वय २४) याच्या ऊसाच्या शेतात व ...

Cannabis caught in a sugarcane field in Kaganri | कागनरीत उसाच्या शेतात गांजा पकडला

कागनरीत उसाच्या शेतात गांजा पकडला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : कागनरी (ता. जत) येथील लक्ष्मण आप्पाराया जगदाळे (वय २४) याच्या ऊसाच्या शेतात व घरी छापा टाकून ६२ हजार रुपयांचा ओला व तयार गांजा उमदी पोलिसांनी पकडला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी केली. उमदी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

पूर्व भागातील लक्ष्मण जगदाळे याचे कर्नाटकातील यत्नाळ सीमेलगत शेत आहे. त्याच्या ऊसाच्या शेतात व घरी गांजा असल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांच्या पथकाने छापा टाकला. शेतात चार फूट उंचीची गांजाची उग्र वास असलेली चार झाडे सापडली. त्यांचे वजन ३ किलो ८०० ग्रॅम होते. बाजारभावाप्रमाणे तो ३८ हजार रुपये किमतीचा आहे.

घरात पिशवीत तयार २४ हजार रुपयांचा १ किलो २०० ग्रॅम गांजा सापडला. गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार बसवराज महादेव कोष्टी यांनी फिर्याद दिली.

Web Title: Cannabis caught in a sugarcane field in Kaganri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.