सांगली जिल्ह्यातील या गावांची कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:37 PM2020-06-20T17:37:57+5:302020-06-20T17:45:19+5:30
सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या खानापूर तालुक्यातील बलवडी-खा, आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती), आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा), आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर) हद्दीत एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे या बाधित क्षेत्रात अधिसूचित केलेले कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचना रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या खानापूर तालुक्यातील बलवडी-खा, आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती), आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा), आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर) हद्दीत एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे या बाधित क्षेत्रात अधिसूचित केलेले कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी देण्यात आलेले आहेत.
खानापूर तालुक्यातील बलवडी-खा
भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित केले होते. बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. १९ मे रोजी निदर्शनास आला होता, त्यानंतर तर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून २८ दिवसांचा कालावधी १६ जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी जारी केलेली दि. १७ मे २०२० ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. १७ जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. १७ जून पासून करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
खानापूर तालुक्यात बलवडी-खा हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.
बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 19 मे रोजी निदर्शनास आला होता तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 16 जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 17 मे 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 17 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 17 जून पासून करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत.
आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती)
आटपाडी तालुक्यात जांभुळणी (गावडे वस्ती) हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 23 मे रोजी निदर्शनास आला होता तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 19 जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 24 मे 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 17 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 19 जून पासून करण्याचे आदेश केलेले आहेत.
आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा)
आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा) हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 21 मे रोजी निदर्शनास आला होता तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 18 जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 23 मे 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 17 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 18 जून पासून करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत.
आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर)
आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी आ. (सोनारसिध्द नगर) हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 23 मे रोजी निदर्शनास आला होता तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही.
शेवटचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 19 जून रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 23 मे 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 17 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 19 जून पासून करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत.