बागलकोटजवळ टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात, बाप लेकांचा जागेवर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 01:28 PM2019-10-03T13:28:34+5:302019-10-03T13:31:01+5:30

शिरूर- बागलकोट ( कर्नाटक राज्य) येथे तवेरा गाडीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने गाडी उलटून  झालेल्या अपघातात दस्तगिर सिकंदर पन्हाळकर (वय ४८) व सिकंदर उमर पन्हाळकर ( वय ७२, दोघे रा.शिराळा, जिल्हा सांगली) या बाप लेकांचा जागेवर मृत्यू झाला.  गुरुवार दि. ४ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान अपघात घडला. या घटनेमुळे शिराळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

The car wrecked, the father died on the spot due to a tire leak | बागलकोटजवळ टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात, बाप लेकांचा जागेवर मृत्यू

बागलकोटजवळ टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात, बाप लेकांचा जागेवर मृत्यू

Next
ठळक मुद्देबागलकोटजवळ टायर फुटल्याने गाडी उलटून अपघातशिराळा बाप लेकांचा जागेवर मृत्यू

शिराळा :  शिरूर- बागलकोट ( कर्नाटक राज्य) येथे तवेरा गाडीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने गाडी उलटून  झालेल्या अपघातात दस्तगिर सिकंदर पन्हाळकर (वय ४८) व सिकंदर उमर पन्हाळकर ( वय ७२, दोघे रा.शिराळा, जिल्हा सांगली) या बाप लेकांचा जागेवर मृत्यू झाला.  गुरुवार दि. ४ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान अपघात घडला. या घटनेमुळे शिराळा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की , गेल्या चार वर्षांपासून सिकंदर पन्हाळकर यांना ब्रेन हँमरेज हा आजार होता. त्यामुळे त्याना उपचारासाठी आंध्रप्रदेश मधील गंदवाल- रायचूर येथे नेत असत. बुधवार दि.३ रोजी रात्री ९ च्या दरम्यान स्वतःची तवेरा गाडी( क्रमांक एम एच ०४ सि बी ७१४७) मधून चालक अस्लम इब्राहिम नदाफ (वय ३६) यांचेसह सिकंदर पन्हाळकर, त्यांची दोन मुले दस्तगिर पन्हाळकर व अबू बक्कर पन्हाळकर (वय ४२) , नातू इक्लास अबूबक्कर पन्हाळकर ( वय १८ ) असे पाच जण गंदवाल येथे उपचारासाठी निघाले होते.

बागलकोट पासून १५ किमी अंतरावरील शिरूर गावाजवळ गाडीचे पुढील दोन्ही टायर अचानक फुटल्याने गाडी उलटी झाली. यामुळे सिकंदर पन्हाळकर , दस्तगिर पन्हाळकर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अस्लम नदाफ, अबू बक्कर पन्हाळकर , इक्लास पन्हाळकर हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच शिराळा येथून नातेवाईक व मित्रमंडळी यांनी बागलकोट शिरूर घटनास्थळी धाव घेतली.
पन्हाळकर यांचा फर्निचर विक्रीचे शिराळा येथे दुकान आहे.

रस्त्यातच जेवण

पन्हाळकर कुटुंबीय रात्री ९ च्या दरम्यान घरातून जेवणाचे डबे घेऊन बाहेर पडले. त्यानी रस्त्यातच जेवण केले.

Web Title: The car wrecked, the father died on the spot due to a tire leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.