काेरोना रुग्णसंख्या घटली; ८२५ नवे रुग्ण, २० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:20 AM2021-07-20T04:20:01+5:302021-07-20T04:20:01+5:30
सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत सोमवारी घट झाल्याने दिलासा मिळाला. दिवसभरात ८२५ नवे रुग्ण आढळले असून, परजिल्ह्यातील ...
सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत सोमवारी घट झाल्याने दिलासा मिळाला. दिवसभरात ८२५ नवे रुग्ण आढळले असून, परजिल्ह्यातील चारजणांसह जिल्ह्यातील १६ अशा २० जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, १०७२ जण कोरोनामुक्त झाले तर म्युकरमायकोसिसचे दोन रुग्ण आढळले.
दहा दिवसांपासून हजारावर असलेल्या रुग्णसंंख्येत चांगली घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील १६ जणांचा मृत्यू झाला, त्यात सांगली २, मिरज १, कडेगाव, जत, मिरज तालुक्यातील प्रत्येकी ३, वाळवा २, खानापूर, पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सोमवारी चाचण्यांचे प्रमाण काहीसे घटले होते. त्यात आरटीपीसीआर अंतर्गत २,८५८ जणांच्या नमुने तपासणीतून २२३ तर रॅपिड ॲन्टिजनच्या ८,९२४ जणांच्या नमुने तपासणीतून ६१३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यातील १० हजार ३७८ जण उपचार घेत असून, त्यातील १,०३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ८७९ जण ऑक्सिजनवर तर १५८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला तर नवे ११ जण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,६५,४७१
उपचार घेत असलेले १०,३७८
कोरोनामुक्त झालेले १,५०,६८२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,४११
पॉझिटिव्हिटी रेट ७.८०
सोमवारी दिवसभरात
सांगली ६२
मिरज १७
आटपाडी ६२
कडेगाव ६५
खानापूर ८७
पलूस ६५
तासगाव ८१
जत ५५
कवठेमहांकाळ २६
मिरज तालुका ९७
शिराळा ४६
वाळवा १६२