आष्ट्यात सर्व प्रभागांत लसीकरण मोहीम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:42 AM2021-05-05T04:42:51+5:302021-05-05T04:42:51+5:30
आष्टा : आष्टा शहरातील दहा प्रभागांत १८ वर्षांवरील सर्व तरुण व नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी ...
आष्टा : आष्टा शहरातील दहा प्रभागांत १८ वर्षांवरील सर्व तरुण व नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजारांच्या दरम्यान आहे. यातील ४५ वर्षांवरील सुमारे २०२८ नागरिकांनी लस घेतली आहे. शहरातील सर्व १० प्रभागांत लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात यावी. कार्यकर्ते प्रत्येक प्रभागातील नागरिकांना जागृत करून त्यांचे लसीकरण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतील. यासाठी सर्व संस्था, युवक मंडळे, सामाजिक संस्था प्रयत्न करणार आहेत. याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, राजारामबापू कारखाना संचालक विराज शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, रघुनाथ जाधव, विजय मोरे, शिवाजीराव ढोले, प्रभाकर जाधव, दीपक मेथे-पाटील, रामचंद्र सिद्ध यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.