कार्वेतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:05+5:302021-04-13T04:25:05+5:30
फोटो -१२०४२०२१आयएसएलएम-कार्वे रस्ता न्यूज कार्वे (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व हायस्कूलकडे जाणारा मुरुमाचा असून, खराब झालेला आहे. ...
फोटो -१२०४२०२१आयएसएलएम-कार्वे रस्ता न्यूज
कार्वे (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व हायस्कूलकडे जाणारा मुरुमाचा असून, खराब झालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रूक : कार्वे (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, चिंचेची टेकडी वसाहत, हायस्कूल व तलावकडे जाण्यारा रस्ता तातडीने डांबरीकरण करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, हायस्कूल व तलाव गावच्या उत्तरेस आहे. तसेच या ठिकाणी बेघर वसाहत असून त्यामध्ये ५० कुटुंबीय राहत आहेत. या ठिकाणी लोकांची सतत ये-जा सुरू असते. मात्र येथील रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. गावापासून हे अंतर सुमारे एक किलोमीटर आहे. यामधील अर्धा रस्ता डांबरी करून झाला आहे, परंतु अर्धा किलोमीटर रस्ता अद्याप मुरुमाचा असून, उखडलेला आहे. त्यामुळे लोकांना ये-जा करण्यास त्रास होतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची सतत ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच या परिसरात हायस्कूल असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही खाच-खळगे सोसतच शाळेत यावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.