ह्यम्हैसाळह्णप्रकरणी चौकशी अधिकारी बदलला

By admin | Published: March 11, 2017 06:03 PM2017-03-11T18:03:51+5:302017-03-11T18:03:51+5:30

पंकजा मुंडेंच्या दौऱ्याने नवा संशयकल्लोळ : भ्रूणहत्येच्या वादग्रस्त प्रश्नांवर मौन

In the case of Himesh's case, the inquiry officer was changed | ह्यम्हैसाळह्णप्रकरणी चौकशी अधिकारी बदलला

ह्यम्हैसाळह्णप्रकरणी चौकशी अधिकारी बदलला

Next

ह्यम्हैसाळह्णप्रकरणी चौकशी अधिकारी बदलला

पंकजा मुंडेंच्या दौऱ्याने नवा संशयकल्लोळ : भ्रूणहत्येच्या वादग्रस्त
प्रश्नांवर मौन

सांगली : म्हैसाळ येथील भ्रूणहत्याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांची केलेली
तडकाफडकी बदली, म्हैसाळला भेट न देता सांगलीत पदाधिकाऱ्यांच्या घरी
दिलेल्या भेटी, अंतर्गत शासकीय आढावा बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची
उपस्थिती, अशा अनेक कारणांनी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचा
दौरा संशयाच्या भोवऱ्यात सापडला.
पंकजा मुंडे यांनी शनिवारी म्हैसाळ येथील भ्रूणहत्याप्रकरणी सांगलीतील
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री सुभाष
देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव
नाईक, आ. सुधीर गाडगीळ, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील,
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व प्रमुख
अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद
साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, डॉक्टर असलेल्या महिला पोलिस उपअधीक्षक
दीपाली काळे यांची आम्ही चौकशी अधिकारी म्हणून नव्याने नियुक्ती केली
आहे. काळे या डॉक्टर असून महिला अधिकारी म्हणून त्यांचा तपासात अधिक
फायदा होऊ शकतो. अत्यंत निंदाजनक आणि समाजासाठी घातक असलेले हे प्रकरण
आहे. याचा जितका निषेध करता येईल, तितका थोडा आहे. समाजातील
स्त्रियांबद्दलची चुकीची मानसिकताही या घटनेतून समोर आली आहे. त्यामुळे
या घटनेला समाजही तितकाच जबाबदार आहे. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार
नाहीत, याची दक्षता आम्ही घेऊ.
यापूर्वी बाबासाहेब खिद्रापुरेविरुद्धच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेले
किंवा भ्रूणहत्या, गर्भलिंग तपासणी यासारख्या गोष्टींमध्ये बेफिकीरी
दाखविण्याऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. याबाबतची चौकशी सुरू आहे.
कोण अधिकारी यास जबाबदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास पूर्ण
झाल्यानंतर याची माहिती जाहीर केली जाईल. पोलिसांचा तपास वेगाने व योग्य
दिशेने सुरू आहे. त्यामुळे कोणाचीही याप्रकरणी गय केली जाणार नाही, असे
त्यांनी स्पष्ट केले.

ह्यनो कॉमेंटस्ह्ण
प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा सल्लागार समितीच्या अ‍ॅड. अर्चना उबाळे
यांना तडकाफडकी दीड वर्षापूर्वी कार्यमुक्त केल्याच्या प्रकरणावर बोलताना
मुंडे म्हणाल्या की, संबंधित अधिकाऱ्यांची मुदत संपल्याने त्यांना
कार्यमुक्त केले असावे. एका अधिकाऱ्याच्या जाण्याने काही फरक पडत नाही.
तरीही हे पद का रिक्त राहिले तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी कोणता आदेश दिला, याबद्दल मला कोणतीही टिपणी करायची नाही. सध्या
नेमण्यात आलेल्या चौकशी समितीतील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी
टिपणी करणार नसल्याचे स्पष्ट केले.

आढावा बैठकीला पदाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय आढावा बैठकीला मुंडे यांच्यासोबत
पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव
नाईक, आ. सुधीर गाडगीळ, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील,
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी
उपस्थित होते. त्यांची उपस्थिती अपेक्षित होती, मात्र भाजपचे
जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, नगरसेविका
स्वरदा केळकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्तेही बैठकीला उपस्थित राहिल्याने
अनेकांच्या भुवया वर गेल्या. बैठकीनंतर याबद्दल चर्चा रंगली होती.

म्हैसाळला भेट नाही...
मुंडे व पालकमंत्री देशमुख यांनी भ्रूणहत्या प्रकरणाची आढावा बैठक
सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, मात्र त्यांनी म्हैसाळ (ता.
मिरज) गावास भेट दिली नाही. बैठकीनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या
निवासस्थानी त्यांनी भेट दिली. पालकमंत्री देशमुख यांनीही घटनेनंतर
एकदाही म्हैसाळला भेट न दिल्याने त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून
टीका सुरू आहे.

मुंडेंनी पाजले उपदेशाचे डोस
शासनाने योजना राबविल्याने काही होणार नाही. समाज शहाणा झाला पाहिजे,
प्रसारमाध्यमांनी त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे, असे उपदेशाचे डोस
शनिवारी पंकजा मुंंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. त्या म्हणाल्या
की, भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत. जनजागृती
मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचा काही परिणाम होत नाही, अशी टीका योग्य
नाही. जोपर्यंत समाज सुधारत नाही, तोपर्यंत योजनांचा परिणाम होणार नाही.
त्यामुळे समाजाने शहाणे बनले पाहिजे. गर्भलिंग तपासणी, मुलींविषयीची
भावना याविषयीचे बदल समाजाने स्वत:हून केले पाहिजेत. प्रसारमाध्यमांनी,
वृत्तपत्रांनीही प्रबोधनाच्या व चांगल्या बातम्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रत्येकाने त्यांची जबाबदारी ओळखावी. सर्व घटकांनी त्यांचे योगदान दिले
तरच योजना यशस्वी होतील.

Web Title: In the case of Himesh's case, the inquiry officer was changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.