मिरजेत छऱ्याच्या बंदुकीतून फैरी झाडल्याने मांजर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:26+5:302021-06-11T04:19:26+5:30
मिरज : मिरजेत छऱ्याच्या बंदुकीतून फैरी झाडल्याने मांजर जखमी झाले. याबाबत पोलिसांना माहिती न देता तक्रार दाखल ...
मिरज : मिरजेत छऱ्याच्या बंदुकीतून फैरी झाडल्याने मांजर जखमी झाले. याबाबत पोलिसांना माहिती न देता तक्रार दाखल न करता, परस्पर मांजरावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर करवाई करण्याची मागणी पीपल्स फॉर अनिमलतर्फे पोलिसांत करण्यात आली आहे.
मिरजेतील बुधवार पेठेत एका व्यक्तीने शेजारचे मांजर वारंवार घरात येत असल्याच्या रागातून पाळीव मांजरावर छऱ्याच्या बंदुकीच्या फैरी झाडल्याने दोन छरे लागून मांजर जखमी झाले. मांजर पाळलेल्या शेजाऱ्याने याबाबत जाब विचारल्यानंतर गोळी झाडणाऱ्याने उपचारासाठी पशुवैद्यकाकडे नेले. मांजरावर शास्त्रक्रिया करून दोन छरे काढण्यात आले. मात्र, जखमी मांजराचा मृत्यू झाला. मांजराचा मृत्यू झाल्यानंतर छरे झाडणाऱ्याने व मांजर पाळणाऱ्यास भरपाई देऊन प्रकरण मिटविल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेची पोलिसांना माहिती न देता या मांजरावर शस्त्रक्रिया व उपचार करणाऱ्या शासकीय पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांसह बंदुकीतून छरे झाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी पीपल्स फॉर अनिमलचे अशोक लकडे यांनी पोलिसांत निवेदनाद्वारे केली आहे.