आरोग्य भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी लावू, आमदार पडळकरांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 11:19 AM2021-12-11T11:19:01+5:302021-12-11T11:21:33+5:30

आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे?, हे जनतेला कळाले पाहिजे.

CBI probe into health recruitment scam says MLA Gopichand Padalkar | आरोग्य भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी लावू, आमदार पडळकरांचा सरकारला इशारा

आरोग्य भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी लावू, आमदार पडळकरांचा सरकारला इशारा

Next

आटपाडी : आरोग्य मंत्र्यांचे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळे पुराव्यानिशी सिद्ध झालेत. या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे. राज्य सरकारने जर, याबाबत टाळाटाळ केली तर, आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी आटपाडीत पत्रकार बैठकीत दिला.

पडळकर म्हणाले, प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्यांच्यामार्फत ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेची कंत्राटे द्यायची, जेणेकरुन पदभरतीमध्ये वसुलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे, हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यताप्राप्त झाले आहे. होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचले आहेत. या पेपरफुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्यात. म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचेच अभय होते का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे?, हे जनतेला कळाले पाहिजे. हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे, याचा पुरावा आहे, असेही पडळकर म्हणाले.

Web Title: CBI probe into health recruitment scam says MLA Gopichand Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.