शिराळ्यात सीसीटीव्ही बसविणार : मानसिंगराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:35+5:302020-12-22T04:26:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. यासाठी सर्वांचा सहभाग व सक्रियता असणे महत्त्वाचे आहे. शहराच्या ...

CCTV to be installed in Shirala: Mansingrao Naik | शिराळ्यात सीसीटीव्ही बसविणार : मानसिंगराव नाईक

शिराळ्यात सीसीटीव्ही बसविणार : मानसिंगराव नाईक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. यासाठी सर्वांचा सहभाग व सक्रियता असणे महत्त्वाचे आहे. शहराच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

शिराळा नगरपंचायतीमार्फत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जनजागृतीपर स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा सुनीता निकम, विजयराव नलवडे, उपनगराध्यक्ष विजय दळवी, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपस्थित होते. आमदार नाईक म्हणाले की, स्वच्छता फक्त नगरपंचायत किंवा प्रशासनाने करावी, अशी भावना न ठेवता आपले घर, आपले कुटुंब स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. राज्यात अग्रेसर राहील यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे.

शहरासाठी पुढील ४० वर्षे पाणी कमी पडणार नाही यासाठी नवीन पाण्याची टाकी, रायझिंग पाईपलाईन याचे काम सुरू होईल, तसेच भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, गोरक्षनाथ परिसर पर्यटन म्हणून विकसित करण्यासाठी लवकरच अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. या कामांमुळे शहराचा विकास होईल. अग्निशमन व्यवस्था, नगरपंचायतीसाठी इमारत, आदींसाठी येत्या महिन्याभरात जागा उपलब्ध होईल. शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण झाले आहेत. तालुक्यात ४० हजार नागरिक मुंबई, आदी ठिकाणाहून आले तरीही उपजिल्हा रुग्णालयामुळे आपण कोरोनाला लांब ठेऊ शकलो.

यावेळी प्रतिभा पवार, माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे, माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, विश्वाप्रताप नाईक, संपतराव शिंदे, विश्वास कदम, प्रमोद नाईक, किर्तीकुमार पाटील, राजू नाईक, संजय हिरवडेकर, आशाताई कांबळ‌े, मोहन जिरंगे, बसवेश्वर शेटे, पृथ्वीसिंह नाईक, अर्चना गायकवाड, सुनील कवठेकर, नयना कुंभार, सुभाष इंगवले उपस्थित होते.

फोटो २१ शिराळा ०१) बक्षीस वितरण करण्यासाठी आमदार नाईक व्यासपीठावरून उतरून खाली आले व पालकांना बोलावून घेऊन त्यांच्यासमवेत बक्षीस वितरण केले.

० २) शहरात आमदार फंडातून सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

Web Title: CCTV to be installed in Shirala: Mansingrao Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.