कुपवाडमध्ये तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:23+5:302021-05-27T04:29:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : शहरातील कवलापूर रस्त्यालगत असलेल्या अवधूत काॅलनीतील खुल्या मैदानावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या ...

Celebrate birthday by cutting a cake with a sword in Kupwad | कुपवाडमध्ये तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा

कुपवाडमध्ये तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शहरातील कवलापूर रस्त्यालगत असलेल्या अवधूत काॅलनीतील खुल्या मैदानावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तिघांविरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील एकावर उद्योजकाची २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये निखिल मोहन कदम (वय २४, रा. बामणोली, ता. मिरज), आकाश प्रताप काटकर (२२), अवधूत केरबा सदामते (२१, दोघेही रा. सावळी, ता. मिरज) यांचा समावेश आहे.

मंगळवारी रात्री शहरातील कवलापूर रस्त्यालगत असलेल्या अवधूत काॅलनीतील खुल्या मैदानावर वाढदिवसानिमित्त काही तरुण तलवारीने केक कापत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. यावेळी निखिल कदम याच्या वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी तीन संशयितांना त्वरित ताब्यात घेतले. पोलिसांनी केक कापण्यासाठी आणलेली तलवार व मोटारसायकल (एमएच १० सीपी ९१६०) असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. पोलिसांनी तीनजणांवर गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे. यातील मुख्य संशयित निखिल कदम याच्यावर कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकाची २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Celebrate birthday by cutting a cake with a sword in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.