शांतिनिकेतनमध्ये झाडाला राखी बांधून सण साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 02:05 PM2020-08-03T14:05:50+5:302020-08-03T14:06:46+5:30
निसर्गाशी असलेले माणसाचे अनोखे नाते स्पष्ट करताना झाडांना राखी बांधून शांतिनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी सोमवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. झाडांच्या रक्षणाची शपथ खावून गेल्या अनेक वर्षांची निसर्गप्रेमाची परंपरा जपण्यात आली.
सांगली : निसर्गाशी असलेले माणसाचे अनोखे नाते स्पष्ट करताना झाडांना राखी बांधून शांतिनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी सोमवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. झाडांच्या रक्षणाची शपथ खावून गेल्या अनेक वर्षांची निसर्गप्रेमाची परंपरा जपण्यात आली.
शांतिनिकेतन आणि निसगाचे अनोखे नाते आहे. या नात्याची जाणीव ठेऊन शांतिनिकेतन आणि परिसरातील मुलींनी सोमवारी वृक्षाला राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. शाळा बंद असल्यामुळे शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसर सुनासुना आहे. पण सोमवारी रक्षाबंधनाच्यानिमित्ताने परिसरातील मुलींनी एकत्र येऊन शांतिनिकेतनमधील झाडाला राखी बांधली आणि अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
ही राखीही मुलींनीच तयार केली. झाड आपणाला आॅक्सिजन देतेच पण तोच खरा माणसाचा आधार आहे. याची जाणीव ठेऊन आम्ही झाडालाच भाऊ समजून राखी बांधली, अशी भावना मुलींनी व्यक्त केली.