सांगलीत आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:34 AM2019-11-19T00:34:52+5:302019-11-19T00:34:59+5:30

सांगली : सांगलीचा ऐेतिहासिक वारसा ठरलेल्या आयर्विन पुलाने सोमवारी वयाची नव्वदी पूर्ण केली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवघ्या सांगलीकरांनी ...

Celebrate Irvine Bridge's birthday in Sangli | सांगलीत आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा

सांगलीत आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा

Next

सांगली : सांगलीचा ऐेतिहासिक वारसा ठरलेल्या आयर्विन पुलाने सोमवारी वयाची नव्वदी पूर्ण केली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवघ्या सांगलीकरांनी संध्याकाळी पुलावर गर्दी केली. ‘हॅपी बर्थ डे’ म्हणत साजरा केला. पुलाच्या उभारणीसाठी राबलेल्या १०४ वर्षांच्या लक्ष्मीबाई पुजारी यांची उपस्थिती कार्यक्रमाचा उत्साह वाढवणारी ठरली.
ब्रिटिशकाळात १८ नोव्हेंबर १९२९ रोजी सांगलीकरांसाठी खुल्या झालेल्या आयर्विन पुलाने नव्वद वर्षे अखंड सेवा दिली. कोणतीही पडझड किंवा संकट न ओढवता सांगलीकर निश्ंिचत मनाने पुलावरुन प्रवास करत राहिले. त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण सांगलीकरांनी आज नव्वदीनिमित्त केले. महापौर संगीता खोत, मुकुंद पटवर्धन, शिवाजीराव ओऊळकर, भालचंद्र चितळे, शंकरलाल मालू, नगरसेविका भारती दिगडे, राजेंद्र कुंभार, सुलभा ताम्हणकर, अतुल गिजरे यांच्यासह अनेकजण आजच्या क्षणाचे साक्षीदार ठरले. पुलाच्या शिलालेखासमोर आकर्षक रांगोळी व पणत्यांची सजावट केली होती. पुलाची ओवाळणी करुन व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
एखाद्या निर्जीव वास्तूचा असा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा होणे, ही रस्त्यावरील प्रवाशांसाठी नवलाईची बाब होती. त्यामुळे अनेकजण थांबून-थांबून सोहळ््यात सहभागी झाले. पुलाचा इतिहास जाणून घेतला. त्याच्यासाठी राबलेल्या लक्ष्मीबार्इंना कार्यक्रमाचे खास निमंत्रण होते. त्यांच्याकडून पुलाच्या बांधकामाचे टप्पे अनेकांनी जाणून घेतले.
महापौर खोत म्हणाल्या, ‘सांगली शहराच्या वाटचालीचा अविभाज्य भाग बनलेला आयर्विन पूल आमच्यासाठी अभिमानाची वास्तू आहे. त्याच्या बांधकामाच्या साक्षीदार लक्ष्मी आजींच्या उपस्थितीने जुन्या आठवणींंना उजाळा मिळाला. त्या सध्या नातेवाईकांसोबत भाड्याच्या घरात राहताहेत. महापालिका त्यांना विश्ोष बाब म्हणून घरकुल देण्यासाठी पुढाकार घेईल’.

Web Title: Celebrate Irvine Bridge's birthday in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.