इस्लामपुरात शिवजयंती उत्साहात
By admin | Published: April 29, 2017 12:10 AM2017-04-29T00:10:50+5:302017-04-29T00:10:50+5:30
इस्लामपुरात शिवजयंती उत्साहात
इस्लामपूर : शहर व परिसरात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या जीवनावरील पोवाडे, सनई, चौघडा आणि भगवे झेंडे यामुळे संपूर्ण शहर भगव्या वादळात न्हाऊन गेले होते.
यल्लम्मा चौकातील शिवसेनेच्या मुख्य सोहळ्यात नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी नगरसेवक विक्रम पाटील, शकील सय्यद, नगरसेविका मंगल शिंगण, सीमा पवार, प्रतिभा शिंदे, अन्नपूर्णा फल्ले, जयवंत खंडागळे, गजानन फल्ले, धोंडीराम पुजारी, पांडुरंग कोरे, राजू कोळी, घन:श्याम जाधव, सुनील गायकवाड, श्रीकांत काळे उपस्थित होते.
दरम्यान, शहरातील न्यायालय परिसर, वडर गल्ली, नवीन बहे नाका, पवार गल्ली, निनाईनगर, आष्टा नाका, अहिल्यानगर, शिवनगर, शिराळा नाका, मार्केट यार्ड, शेलार कॉर्नर अशा विविध परिसरात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली.
युवा नेते उमेश पवार, सागर मलगुंडे, अविनाश पवार, सोमनाथ पवार, शुभम पाटील, स्वप्निल पाटील, राहुल टिबे, रोहित नाझरे, कपिल पवार, विनोद कुचीवाले, सचिन कुचीवाले, विनोद वडार, प्रताप खराडे, दिलीप कुचीवाले यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदींंनी शिवजयंती उत्सवाचे संयोजन केले. (वार्ताहर)