गोटखिंडी येथील मशिदीत शिवजयंती साजरी, माळवाडीतील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 09:14 PM2018-02-19T21:14:04+5:302018-02-19T21:16:54+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझांर चौकातील मशिदीत न्यू गणेश तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयाचे पूजन विनायक पाटील, विजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझांर चौकातील मशिदीत न्यू गणेश तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयाचे पूजन विनायक पाटील, विजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विजय लोंढे, अध्यक्ष गणेश फाळके, रियाज मुलाणी, जमीर जमादार, प्रदीप पाटील, हणमंत जाधव, रोहन थोरात, राहुल कोकाटे, रोहन थोरात, बाबूराव पठाण उपस्थित होते.
माळवाडी परिसरातील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण फलकाचे उद्घाटन सरपंच विजय लोंढे, उपसरपंच नंदकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर महाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जगन्नाथ पाटील, अक्षय पाटील, नितीन पाटील, रामचंद्र पाटील, प्रकाश एटम, प्रकाश पाटील, सागर डवंग, विनायक पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील, अभिजित घारे, रामचंद्र घारे, विलास खराडे, दिलीप पाटील, के. डी. पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी, व तरुण शिवभक्त उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीमध्ये शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच विजय लोंढे, उपसरपंच नंदकुमार पाटील, प्रदीपदादा पाटील, पोपट डवंग, राहुल भोईटे, महेश शेजावळे, उदय थोरात, रमेश पाटील, दिलीप पाटील, अभिजित घारे, जगदीश पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते. शिंगटे मळ्यात हिंदवी तरुण मंडळ, शिवतेज तरुण मंडळांकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. तर पन्हाळगड येथून अनेक तरुणांनी ज्योत आणली होती. यावेळी संपूर्ण गावातून शिवगर्जना व भगवे झेंडेनी गांव शिवमय झाला होता. दरम्यान, शिवसेना शाखाप्रमुख रामंचद्र घारे यांनी ग्रामसचिवालयासमोरील आठवडी बाजारास ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नामकरण करण्याची सरपंच विजय लोंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.