लूटमारीच्या उद्देशाने रेल्वे मार्गावर ठेवले सिमेंटचे खांब, मिरज रेल्वे पोलिसांनी केली दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 12:55 PM2022-02-16T12:55:03+5:302022-02-16T12:55:35+5:30

लोणंद व सालपे या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर तीन ठिकाणी सिमेंटचे खांब ठेवून रेल्वेगाड्या आडविण्याचा प्रयत्न

Cement pillars placed on railway tracks for looting purposes, Miraj railway police arrested the two | लूटमारीच्या उद्देशाने रेल्वे मार्गावर ठेवले सिमेंटचे खांब, मिरज रेल्वे पोलिसांनी केली दोघांना अटक

लूटमारीच्या उद्देशाने रेल्वे मार्गावर ठेवले सिमेंटचे खांब, मिरज रेल्वे पोलिसांनी केली दोघांना अटक

Next

मिरज : मिरज-पुणे रेल्वेमार्गावर लोणंद ते सालपे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेगाड्या रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर सिमेंटचे खांब ठेवणाऱ्या दोघांना मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली. लालसिंग कमलसिंग पंद्दू (वय ६०, रा. मंडला, ता. बचिया, रा. मध्यप्रदेश) व सुखदेव बुटासिंग सरोते (वय ३९, रा. बह्या, बागापूर वनग्राम, ता. बचिया, मध्यप्रदेश) या दोघांनी दारूच्या नशेत लूटमारीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले.

पद्दू व सरोते या दोघांनी लोणंद व सालपे या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर तीन ठिकाणी सिमेंटचे खांब ठेवून रेल्वेगाड्या आडविण्याचा प्रयत्न केला होता. रेल्वे मार्गावर सिमेंट खांबामुळे महालक्ष्मी व गोवा एक्स्प्रेस काही काळ थांबविण्यात आल्या.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे घटनास्थळी धाव घेत, सिमेंटचे खांब हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली. हा प्रकार करणाऱ्या पंद्दू व सरोते या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांनी हा प्रकार दारूच्या नशेत रेल्वे प्रवाशांची लूटमार करण्यासाठी रेल्वे अडविण्यासाठी केला, का घातपातासाठी? याचा मिरज रेल्वे पोलीस तपास करीत आहेत. रेल्वे अडविण्याच्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

Web Title: Cement pillars placed on railway tracks for looting purposes, Miraj railway police arrested the two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.