शेतकऱ्यांना केंद्राने ३५ हजार कोटी भरपाई द्यावी - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 07:47 AM2020-10-19T07:47:54+5:302020-10-19T07:51:25+5:30
शेट्टी म्हणाले, गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे सर्वच विभागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यायांंना हेक्टरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असल्याने त्यांनी या मागणी
सांगली : राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून १५ हजार कोटी, तर केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून केंद्र शासनाने ३५ हजार कोटी रुपयांची रक्कम भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
शेट्टी म्हणाले, गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे सर्वच विभागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यायांंना हेक्टरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असल्याने त्यांनी या मागणीची अंमलबजावणी करावी.