जिल्ह्यात केंद्रीय सैनिकी स्कूल स्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:37+5:302021-07-09T04:17:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि देशसेवेप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी सांगली जिल्ह्यात केंद्रीय ...

Central Military School should be established in the district | जिल्ह्यात केंद्रीय सैनिकी स्कूल स्थापन करावे

जिल्ह्यात केंद्रीय सैनिकी स्कूल स्थापन करावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि देशसेवेप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी सांगली जिल्ह्यात केंद्रीय सैनिकी स्कूलची स्थापना करावी, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली.

खासदार पाटील यांनी दिल्लीत सिंग यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातून देशसेवेसाठी अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. कवठेमहांकाळ येथे तरुणांना लष्करात भरती होण्यासाठी अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविली जाते. यामधून शेकडोंच्या संख्येने तरुण देशसेवेसाठी लष्करामध्ये भरती होतात. तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे भारतीय वायुसेना विभागातील पदांसाठीसुद्धा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळीही शेकडो तरुणांना यामुळे देशसेवेची संधी मिळाली. सांगली जिल्ह्यातील तरुणांना विद्यार्थीदशेपासूनच जर सैनिकी प्रशिक्षण मिळाले तर त्यांना त्याचा भविष्यात लाभ होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात केंद्रीय सैनिकी स्कूलची स्थापना करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Central Military School should be established in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.