मध्य रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचा आज दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:25 AM2021-01-22T04:25:08+5:302021-01-22T04:25:08+5:30
कोरोना साथीमुळे सलग सहा महिने रेल्वे वाहतूक बंद होती. अद्यापही मर्यादित प्रवासी वाहतूक सुरू आहे. महाव्यवस्थापकांच्या ...
कोरोना साथीमुळे सलग सहा महिने रेल्वे वाहतूक बंद होती. अद्यापही मर्यादित प्रवासी वाहतूक सुरू आहे. महाव्यवस्थापकांच्या या दौऱ्यानंतर रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या महाव्यवस्थापकांच्या या दौऱ्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे गेले दोन महिने तयारी सुरू आहे. महाव्यवस्थापकांची विशेष रेल्वे गाडी सातारा, कोल्हापूर व मिरज या मार्गांवर धावणार आहे. संबंधित सर्व स्थानकांवर त्याची तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प होती. बहुसंख्य रेल्वे गाड्या अद्यापही बंद आहेत, तर सुरू असलेल्या गाड्या विशेष रेल्वे असल्याने त्या कधीपर्यंत सुरू राहणार याबाबत संभ्रम आहे. महाव्यवस्थापकांच्या या दौऱ्यात रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. कृषी मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेने सुरू केलेली किसान रेल्वे सुरू ठेवण्याबाबत महाव्यवस्थापक मित्तल यांच्या या दौऱ्यात आढावा घेण्यात येणार आहे.
फोटो-२१संजीव मित्तल