रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉक, महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 01:03 PM2022-11-11T13:03:11+5:302022-11-11T13:03:38+5:30

कोल्हापूर - मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच जाणार

Central Railway megablock, Mahalakshmi Express cancelled | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉक, महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द

संग्रहित फोटो

Next

मिरज : मध्य रेल्वेतर्फे मुंबई शहरातील रोड ओव्हर ब्रिज हटविण्यासाठी शनिवार, १९ नोव्हेंबर व रविवार, २० नोव्हेंबरदरम्यान २७ तासांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस व रविवारी मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर - मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच जाणार असून, रविवार, २० नोव्हेंबर रोजी कोयना एक्स्प्रेस पुण्यातूनच कोल्हापूरला येणार आहे.

Web Title: Central Railway megablock, Mahalakshmi Express cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.