दुष्काळ पाहणीसाठी आज केंद्रीय पथक सांगली जिल्ह्यात : प्रशासनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:31 AM2018-12-06T00:31:50+5:302018-12-06T00:32:41+5:30
गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनने फिरविलेली पाठ आणि तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
सांगली : गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनने फिरविलेली पाठ आणि तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून सवलती मिळण्यासाठी आवश्यक असलेला केंद्रीय पथकाचा आज, गुरुवारी जिल्हा दौरा होत आहे. जिल्ह्यातील विविध भागांची या पथकाकडून पाहणी होणार आहे. पथकाच्या दौऱ्याची सुरुवात आटपाडी तालुक्यातून होणार आहे.
दौºयात सहभागी अधिकाºयांची माहिती व त्यांच्या दौºयाबाबत पथकाकडूनच गोपनीयता पाळण्यात आली आहे.
राज्य सरकारने जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असून, केंद्र सरकारच्या पातळीवरून मिळणाºया सोयी-सवलती मिळविण्यासाठी केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी होणे आवश्यक आहे. त्यानुसार पुणे विभागातील दुष्काळी भागाच्या दौºयास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. गुरुवारी पथक जिल्ह्यात दाखल होणार आहे.
बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या पाहणीनंतर पथकाचा पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व त्यानंतर आटपाडी तालुक्याची पाहणी अशी प्राथमिक दौºयाची आखणी करण्यात आली आहे. या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह मंत्रालय स्तरावरील काही अधिकारी आहेत.
सांगली जिल्ह्यात आटपाडीसह आणखी कोणत्या भागाची पाहणी करावयाची, याबाबत पथकातील अधिकाºयांनी माहिती दिली नाही. एकादिवशी चार जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्याचे पथकाचे नियोजन असल्याचे समजते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाहणी झाल्यानंतर पथक आटपाडी तालुक्यातील पाहणी करून सातारा जिल्ह्यात जाणार असल्याचे समजते. मात्र, दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता पथकाकडून जत व कवठेमहांकाळ तालुक्याचीही पाहणी होऊ शकते. जिल्हा प्रशासनाने पथकासाठी दहा ते पंधरा ठिकाणच्या पाहणीचे नियोजन केले आहे.
लोकप्रतिनिधींचाही सहभाग
केंद्रीय पथकातील सदस्यांना दौºयाची माहिती व ‘रूट प्लान’ देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत पंढरपूरला रवाना झाले आहेत. गुरुवारच्या दौºयावेळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी सहभागी असणार आहेत. या दौºयाची लोकप्रतिनिधींनाही माहिती देण्यात आली आहे. त्या-त्या भागातील आमदारांना पथकाच्या पाहणीवेळी उपस्थित राहण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.