वाळूसाठी नदीकाठाची चाळण

By admin | Published: August 26, 2016 12:21 AM2016-08-26T00:21:44+5:302016-08-26T01:14:54+5:30

भिलवडी परिसरातील चित्र : ठेका एका काठावर, उपसा संपूर्ण कृष्णा नदीभर

Chalan of the river for sand | वाळूसाठी नदीकाठाची चाळण

वाळूसाठी नदीकाठाची चाळण

Next

शरद जाधव -- भिलवडी  --केवळ पैसा मिळविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे सैराट बनलेले वाळू तस्कर व जाणीवपूर्वक गांधारीची भूमिका घेणारे सुस्त प्रशासन यामुळे वाळू ठेका एका प्लॉटमध्ये अन् उपसा संपूर्ण कृष्णाकाठावर, असे चित्र आहे. यामुळे पलूस तालुक्यातील भिलवडीसह कृ ष्णा काठाची अक्षरश: चाळण झाली आहे. याप्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
वारंवार व अनधिकृतपणे होणाऱ्या वाळू उपशामुळे नदीकाठची मळी खचण्याबरोबरच जल प्रदूषणाचाही मोठ्याप्रमाणात धोका निर्माण होत आहे. विशेषत: पलूस तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी वाळू उपशाला विरोध केला. यामुळे वाळू तस्करांबरोबरच महसूल बुडाल्याने प्रशासनाचा मोठा तोटा झाला असल्याची चर्चा अधिकारी वर्गातून होत आहे. महसूल विभागातील अधिकारी जनतेच्या प्रचंड कळवळ्याने वाळू ठेके चालू करण्यासाठी गावोगाव समक्ष भेटून प्रबोधन करीत होते. गावा-गावात विशेष ग्रामसभाही घेण्यात आल्या. तुम्ही वाळू ठेक्याला का विरोध करता, अशी विचारणा करण्यात आली. खचत असलेला मळीभाग, वाढणारे जलप्रदूषण, तसेच नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने मगरींचे माणसांवर होणारे हल्ले, खराब होणारे रस्ते, जमिनीतील जलवाहिन्यांचे नुकसान आदी कारणांमुळे वाळू ठेक्याला प्रखर विरोध होऊ लागला आहे. प्रथमच प्रशासनाला नागरिकांपुढे हतबल होण्याची वेळ आली. मात्र ठेके वाळवा तालुक्यातील नदीकाठी अन् उपसा पलूस तालुक्यात, हा नवा फॉर्म्युला ठेकेदार अन् प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे.
मर्दवाडीतील ठेके दार पाण्यातील बोटी अन् पाईप वाढवून भिलवडी हद्दीतील वाळू उपसा करू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून या गोष्टीची चौकशी करण्यासाठी गेलेले भिलवडीचे सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना धमकी ठेकेदार देतात. पलूसचे प्रशासन केवळ चौकशीचा फार्स करून पडदा टाकते, ही शोकांतिका आहे. तुमचा वाळू ठेका जर अधिकृत असेल, तर निर्धारित केलेल्या क्षेत्रात व मुदतीतच वाळू उपसा करावा, अशी मागणी भिलवडी ग्रामपंचायतीची आहे.


‘लोकमत’च्या दणक्याने उपसा अंतर घटले
सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांनी तालुका प्रशासनाने तक्रार करूनही दखल न घेतल्याने भिलवडी पोलिसांत तक्रार केली आहे. या घटनेचे वृत्त सडेतोडपणे प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने भेट देऊन पाहणी केली, मात्र भिलवडीच्या काठावर उपसा करणाऱ्या बोटी वाळवा हद्दीत पूर्ववत नेल्याचे आढळून आले. चौकशी सुरू झाली की, नियमात उपसा व वातावरण थंड झाले की मोठ्या मशिनरीने उपसा केला जातो.

Web Title: Chalan of the river for sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.