सांगली-मिरजेत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस कर्नाटकात अटक, चिकोडी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 04:58 PM2018-02-14T16:58:09+5:302018-02-14T17:03:22+5:30
मिरज-सांगली या भागातून मोटार सायकल चोरी करून कर्नाटकात विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला कर्नाटकमधील चिकोडी पोलीसांनी अटक केली आहे.
म्हैसाळ : मिरज-सांगली या भागातून मोटार सायकल चोरी करून कर्नाटकात विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला कर्नाटकमधील चिकोडी पोलीसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये किरण शिवाजी बागडी (वय २६, रा म्हैसाळ) बबलू आभास पठाण (वय २४), राघवेंद्र मोहन माने (वय २३), आप्पा केंसगोडा (वय २४), सदाम कलदंर पठाण (वय २६, सर्व रा. रायबाग) यांचा समावेश आहे. याप्रकरणी संतोष सनदी (वय ३०) हा संशयित आरोपी फरारी आहे. या टोळीमध्ये कर्नाटकातील सहा व महाराष्ट्रातील एका युवकाचा सहभाग होता.
हे युवक मिरज सांगली परीसरातून मोटारसायकली चोरी करून कर्नाटक राज्यामध्ये विक्री करत असल्याचा अंदाज आहे. सांगली व मिरज परीसरातून चोरीला गेलेल्या गाड्यांची तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात केली आहे तेथे संपर्क साधावा. त्यानंतर संबधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात गाड्या देण्यात येतील, अशी माहीती चिकोडीचे पोलीस निरीक्षक ए. पी. होसमनी यांनी दिली.