‘सहकार’ला ‘संस्थापक’चे आव्हान

By admin | Published: July 17, 2015 10:49 PM2015-07-17T22:49:51+5:302015-07-17T22:49:51+5:30

आर्थिक स्थितीचा आढावा : ‘कृष्णा’ कर्जबाजारी असल्याची कोल्हेकुई

Challenge of 'Founder' to 'Sahakar' | ‘सहकार’ला ‘संस्थापक’चे आव्हान

‘सहकार’ला ‘संस्थापक’चे आव्हान

Next

अशोक पाटील - इस्लामपूर -सहकार पॅनेलचे अध्यक्ष सुरेश भोसले यांनी नूतन संचालकांच्या बैठकीत ‘कृष्णा’च्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. ‘कृष्णा’वर ५२0 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा गाजावाजा काही संचालकांनी प्रसारमाध्यमांतून केला. परंतु गेल्या पाच वर्षात संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी कोणत्याही प्रकारची देणी न ठेवता कारखाना व्यवस्थित चालविल्याचा दावा संस्थापक पॅनेलने केला आहे.
संचालकांच्या झालेल्या बैठकीत संस्थापक पॅनेलवर विविध आरोप करण्यात आले आहेत. त्यांचे खंडण संस्थापक पॅनेलने केले आहे. साखरेच्या घसरलेल्या दरामुळे सर्वच कारखाने अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत कारखान्याने २१00 रुपये दर दिला आहे. तरीसुध्दा काही संचालकांनी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना पुरवली आहे. पर्यावरणासंदर्भात काही जणांनी खोट्या तक्रारी केल्यामुळे कारखान्याची डिस्टिलरी दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कारखान्याला आर्थिक अडचण निर्माण झाली. गेल्या पाच वर्षात एकदाही कामगारांची देणी थकलेली नाहीत. शेतकऱ्यांचे जाहीर केलेले सर्व पैसे कारखान्याने दिले आहेत. कारखान्याचे कोणतेही कर्ज थकित नाही. दि. १९ जूनरोजी एन.सी.डी.सी.च्या कर्जाचा बोजा हटला आहे. सध्या साखरेच्या दरातील घसरणीमुळे पैशाची उपलब्धता होत नाही, ही वस्तुस्थिती असताना, नवीन अध्यक्षांची खुशमस्करी करण्यासाठी कर्जाचे आणि देय रकमेचे खोटे आकडे जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांना देण्यात आल्याचाही आरोप संस्थापक पॅनेलने केला आहे.
नूतन संचालकांच्या बैठकीत अविनाश मोहिते आणि त्यांचे सहकारी संचालक संपूर्ण वेळ उपस्थित होते. सभेच्या प्रारंभीच अविनाश मोहिते यांनी नूतन अध्यक्षांना उद्देशून प्रास्ताविक केले. कारखान्याच्या हिताच्या गोष्टीला आमचा पाठिंबा राहील, मात्र चुकीच्या गोष्टींना विरोधच राहील. कारखान्याच्या कर्जाचा आणि देणी रकमेचा सत्ताधाऱ्यांनी बाऊ केला आहे. साखर, मोलॅसिस शिल्लक आहे. त्यातून उत्पन्न मिळणार आहे.
गेली ५ वर्षे साखर कारखाना कर्जातच होता. जुने कर्ज आम्ही फेडले आणि उसाला योग्य दर दिला आहे. निवडणूक लढविताना तुम्ही आपण कारखान्याची जबाबदारी घेत असल्याचे सभासदांना छातीठोकपणे सांगितले आहे. आता कोणत्याही सबबी न सांगता घेतलेली जबाबदारी पार पाडा. त्याचे खापर संस्थापक पॅनेलवर फोडण्याचा प्रयत्न करू नका, असेही संस्थापक पॅनेलने सत्ताधाऱ्यांना बजावले आहे.

चुकीच्या गोष्टींना विरोध
माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी नूतन अध्यक्षांना उद्देशून प्रास्ताविक केले. आपल्या कारकीर्दीतील अनुभव कथन करताना कारखान्याच्या हिताच्या गोष्टीला आमचा पाठिंबा राहील, मात्र चुकीच्या गोष्टींना विरोधच राहील. कारखान्याच्या कर्जाचा आणि देणी रकमेचा सत्ताधाऱ्यांनी बाऊ केला आहे. साखर, मोलॅसिस शिल्लक आहे. त्यातून उत्पन्न मिळणार आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्षांची खुशमस्करी
कारखान्याचे कोणतेही कर्ज थकित नाही. दि. १९ जूनरोजी एनसीडीसीच्या कर्जाचा बोजा हटला आहे. सध्या साखरेच्या दरातील घसरणीमुळे पैशाची उपलब्धता होत नाही, ही वस्तुस्थिती असताना, नवीन अध्यक्षांची खुशमस्करी करण्यासाठी कर्जाचे आणि देय रकमेचे खोटे आकडे प्रसारमाध्यमांना देण्यात आल्याचाही आरोप संस्थापक पॅनेलने केला आहे.

डिस्टिलरी बंद
पर्यावरणासंदर्भात काही जणांनी खोट्या तक्रारी केल्यामुळे कारखान्याची डिस्टिलरी बंद आहे. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली, असे मोहिते म्हणाले.
कलगीतुरा रंगणार
माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि त्यांच्या संचालकांनी ‘कृष्णा’ कर्जात नसल्याचा दावा केला आहे, तर डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलने, कारखाना कर्जात असून लाकूड खरेदीलाही पैसा नसल्याचे जाहीर केले आहे. वास्तविक पाहता, या आजी-माजी अध्यक्षांमधील कलगीतुरा चांगलाच रंगू लागला आहे.

Web Title: Challenge of 'Founder' to 'Sahakar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.